शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

दारू विक्रीविरूद्ध महिलांचा एल्गार

By admin | Updated: June 29, 2014 23:51 IST

येथे राजरोसपणे अवैधरित्या दारूची विक्री करण्यात येत असल्याने गावातील महिला वर्गांत संतापाची लाट आहे. या अवैध दारूविक्रीला कंटाळलेल्या महिलांनी तंटामुक्त गाव समितीच्या माध्यमातून तुर्तास

मारोडा : येथे राजरोसपणे अवैधरित्या दारूची विक्री करण्यात येत असल्याने गावातील महिला वर्गांत संतापाची लाट आहे. या अवैध दारूविक्रीला कंटाळलेल्या महिलांनी तंटामुक्त गाव समितीच्या माध्यमातून तुर्तास विक्रेत्यांवर अंकुश मिळविलेला आहे. युवकांच्या सहकार्याने नुकतेच तीन अवैध दारू विक्रेत्यांना पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. मारोडा, उश्राळा, भादुर्णी या परिसरातील गावात अवैध दारूविक्रीला ऊत आला होता. या परिसरापासून अगदी ६ किलोमिटर अंतरावरील मूल पोलीस ठाण्याच्या बाजुला असलेल्या गावात मोठ्या प्रमाणात अवैध दारू-विक्रेते तयार झाले. त्यामुळे अनेक कुटुंब प्रमुख महिला व पुरुषांनी कमी कष्टाच्या व अधिक नफ्याच्या या बेकायदेशीर व्यवसायाला सुरूवात केली. दुसरीकडे याचे व्यसन शेतकरी वर्ग व सुशिक्षितांना मोठ्या प्रमाणात लागल्याने अनेकांच्या संसारात वितंडवाद सुरू झाला. गावांत वाद वाढू लागले. सध्या कुणाचाही धाक नसलेल्या या गावात व्यसनाचे एवढे प्रमाण वाढले की, ज्येष्ठ नागरिकांना नव्या पिढीची भीती वाटू लागली. अखेर महिलांनी महात्मा गांधी तंटामुक्त ग्राम समितीला सहकार्याची हमी दिली. गावातून दारूबंदीसाठी जनजागृती करण्यासाठी महिलांनी फेरी काढली. सरपंच बंडू वाढई, तंटा मुक्त समितीचे अध्यक्ष बालाजी मेश्राम, पोलीस पाटील ताराचंद गेडाम यांच्या मार्गदर्शनात दारूबंदी महिला समितीचे प्रमुख म्हणून शेंडे व युवक समितीचे प्रमुख म्हणून राम उत्तुरवार यांच्याकडे सूत्र देण्यात आले. या समित्यांनी दोन दिवसांत मिळेल त्या ठिकाणी दारू गावात आणणाऱ्यांची झडती घेऊन त्यांच्यावर चांगलाच दबाव निर्माण केला आहे. सध्या दोन-तीन जणांना पोलिसांनी पकडले असून गावातील अवैध दारू विक्रेत्यांनी तुर्तास दारूविक्री बंद केले आहे. पोलिसांनी पुढेही सहकार्य करावे, अशी महिलांची मागणी आहे. (वार्ताहर)