शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
4
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
5
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
6
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
7
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
8
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
9
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
10
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
11
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
12
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
13
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
14
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
15
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
16
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
17
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
18
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
19
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
20
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
Daily Top 2Weekly Top 5

वाघाच्या भीतीने कापूस वेचणीसाठी महिलांचा नकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2019 06:00 IST

सध्या शेतात कापूस वेचणीचा हंगाम सुरू आहे. साखरवाही परिसरात मागील चार दिवसांपासून वाघ आल्याची अफवा पसरली आहे. कुणी या परिसरात वाघ दिसल्याचे सांगतात तर कुणी ही निव्वळ अफवा असल्याचे सांगत असले तरी या परिसरातील नागरिकात वाघाची मोठी दहशत पसरल्याने कापूस वेचणी करायला जाणाऱ्या महिलादेखील शेतात जाण्यासाठी नकार देत आहे.

ठळक मुद्देसाखरवाही, सुमठाना परिसरात वाघाची दहशत

लोकमत न्यूज नेटवर्कगोवरी : राजुरा तालुक्यातील साखरवाही, सुमठाना परिसरात गेल्या चार दिवसांपासून वाघ आल्याच्या अफवेने नागरिकांत दहशत पसरली आहे. शेतकऱ्यांमध्ये व कापूस वेचणीसाठी शेतात जाणाऱ्या महिलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे या महिला कापूस वेचणीसाठी शेतात जाण्यास नकार देत आहेत.राजुरा तालुक्यात वन्यप्राणी व मानव संघर्ष सुरू आहे. वाघाने जंगल सोडून वस्तीत धाव घेतल्याने नागरिकात मोठी दहशत पसरली आहे. साखरवाही, सूमठणा परिसरात गेल्या चार-पाच दिवसांपासून वाघ आल्याची अफवा पसरली आहे. त्यामुळे शेतकºयात मोठी दहशत पसरली असून कापूस वेचणी करायला जाणाऱ्या महिलादेखील कापूस वेचणीसाठी जायला तयार नाही. या परिसरात मोठया प्रमाणात जंगल असल्याने नेहमी गावालगत वन्यप्राणी येतात. आता चक्क वाघच आल्याने या परिसरातील नागरिक चांगलेच धास्तावले आहे. जंगलात झुडुपे मोठया प्रमाणात वाढली आहे. दिवसा येथे वन्यप्राणी राहत असल्याने शेतीचे वन्यप्राण्यांकडून नुकसान करण्यात येत आहे. सध्या शेतात कापूस वेचणीचा हंगाम सुरू आहे. साखरवाही परिसरात मागील चार दिवसांपासून वाघ आल्याची अफवा पसरली आहे. कुणी या परिसरात वाघ दिसल्याचे सांगतात तर कुणी ही निव्वळ अफवा असल्याचे सांगत असले तरी या परिसरातील नागरिकात वाघाची मोठी दहशत पसरल्याने कापूस वेचणी करायला जाणाऱ्या महिलादेखील शेतात जाण्यासाठी नकार देत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची कापूस वेचणीसाठी मोठी पंचाईत झाली आहे. जंगल नष्ट होऊ लागल्याने वन्यप्राणी वस्तीकडे धाव घेत आहे. राजुरा तालुक्यात वन्यप्राण्यांनी मानवावर हल्ले करण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. त्यामुळे नागरिकांत मोठी दहशत पसरली आहे. कापूस वेचणीला मजूर मिळत नसल्याने शेतकरी बाहेरून मजूर आणून कापूस वेचणी करीत आहे. परंतु साखरवाही परिसरात वाघ आल्यामुळे या परिसरात बाहेरून येणाऱ्या महिला कापूस वेचणीसाठी नकार देत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची कापूस वेचणीसाठी मोठी पंचाईत झाली आहे. त्यामुळे वनविभागाने वाघाचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी परिसरातील नागरिक व शेतकऱ्यांनी केली आहे.

टॅग्स :Tigerवाघ