शहरं
Join us  
Trending Stories
1
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
2
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
3
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
4
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
5
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
6
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
7
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
8
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
9
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
10
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
11
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
13
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
14
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
15
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
16
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
17
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
18
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
19
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
20
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

पतीच्या काठीहल्ल्यामुळे पत्नी वाघाच्या तावडीतून सुटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:36 IST

कोठारी : कोठारी वनपरिक्षेत्रातील नियत क्षेत्रातील हरणपायली बीट क्र. ५४१ लगत असलेल्या शेतात तूर पिकाचे रक्षण तथा जागल करण्यासाठी ...

कोठारी : कोठारी वनपरिक्षेत्रातील नियत क्षेत्रातील हरणपायली बीट क्र. ५४१ लगत असलेल्या शेतात तूर पिकाचे रक्षण तथा जागल करण्यासाठी गेलेल्या एका महिलेवर वाघाने हल्ला चढविला. काही अंतरावरच असलेल्या तिच्या पतीने वाघाच्या दिशेने पूर्ण ताकदीनिशी काठी भिरकावली. काठी बसताच वाघ पतीच्या मागे लागला. मात्र समयसूचकता दाखवत पती झाडावर चढला व आरडाओरड सुरू केली. त्यामुळे वाघ जंगलाच्या दिशेने पळाला.

ही थरारक घटना बुधवारी रात्री १० वाजताच्या दरम्यान घडली. कोठारी परिसरातील स्थानिक वनक्षेत्रात येणाऱ्या हरणपायली बीटातील नियत क्षेत्रालगत असलेल्या भाडेतत्त्वावर घेतलेल्या जमिनीवर तूर पिकाच्या राखणीसाठी कोठारी येथील करणकुमार कन्नाके व त्यांच्या पत्नी लीला करणकुमार कन्नाके सायंकाळी ७ वाजताच्या दरम्यान शेतात गेले होते. रात्री १० वाजताच्या दरम्यान लीला कन्नाके या झोपडीपासून काही अंतरावर गेल्या असता शेतालगतच दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला केला. आधीच सावध असलेल्या महिलेने किंचाळण्यास सुरुवात केली. त्या आवाजाच्या दिशेने पती करणकुमार यांनी धाव घेतली. पत्नीच्या जवळ वाघ दिसताच त्याने जवळ असलेली काठी वाघाच्या दिशेने ताकदीने भिरकाविली आणि वाघावर काठीचा प्रहार होताच वाघ करणकुमारवर हल्ला करण्यासाठी धावला. त्याच वेळी करणकुमार झाडावर चढला व मोठ्याने आरडाओरड करू लागला. यामुळे वाघ जंगलात पसार झाला. यात लीला कन्नाके या जखमी झाल्या असून, त्यांना चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेची माहिती तात्काळ कोठारी वनाधिकारी यांना देण्यात आली. पतीच्या समयसूचकतेमुळे पत्नीचे प्राण वाचले. या घटनेनंतर परिसरातील शेतकऱ्यात भीतीचे सावट पसरले आहे.