शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
2
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
3
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
4
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
5
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
6
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
7
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
8
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
9
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
10
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
11
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
12
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
13
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
14
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
15
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
16
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
17
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
18
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
19
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
20
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
Daily Top 2Weekly Top 5

पुनर्वसन होणाऱ्या गावात शाळा बांधकाम कशाला ?

By admin | Updated: May 17, 2015 01:35 IST

सिनाळा गट ग्रामपंचायत अंतर्गत सिनाळा, नवेगाव, मसाळा (जुना) या तिन्ही गावाचे दुर्गापूर वाढीव खुल्या कोळसा खाणीसाठी पुनर्वसन होणार असून आहे.

चंद्रपूर : सिनाळा गट ग्रामपंचायत अंतर्गत सिनाळा, नवेगाव, मसाळा (जुना) या तिन्ही गावाचे दुर्गापूर वाढीव खुल्या कोळसा खाणीसाठी पुनर्वसन होणार असून आहे. त्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असताना सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत नवेगाव येथे शाळेचे बांधकाम करण्यात येत आहे. सिनाळा ग्रामपंचायतीच्या हद्दीतील या तिन्ही गावाचे पुनर्वसन होणार असल्यामुळे शासनाने या गावातील सर्व योजना बंद केल्या असताना गावात शाळेचे बांधकाम कसे काय करण्यात येत आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेस मागासवर्ग सेलचे महेंद्र मेश्राम यांनी म्हटले आहे. या कामाला स्थगीती देऊन दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आही. येथे होत असलेले शाळा इमारतीचे बांधकाम हा पैशाचा दुरूपयोग असून सत्ता उपभोगणाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष होत आहे, असे मेश्राम यांनी म्हटले आहे.सिनाळा, नवेगाव, मसाळा (जुना) या तिन्ही गावाचा टी.एल.आर. सर्व्हे उपअधिक्षक भुमी अभिलेख कार्यालय चंद्रपूरकडून झालेला आहे. वेकोलिने या तिन्ही गावाच्या पुनर्वसनाकरिता कोयना गेट, सबेरिया आॅफीस पद्मापूरच्या बाजुला जागा आरक्षित केली आहे. त्याचा फलक सुद्धा लावण्यात आलेला आहे. पुनर्वसन प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्यामुळे शासनाने या गावातील सर्व नविन योजना बंद केल्या आहेत. शासनाचे कोणतेही बांधकाम या ग्रामपंचायतीच्या हद्दीत होताना दिसत नाही. परंतु, नवेगाव येथे सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत शाळेचे बांधकाम करण्यात येत आहे, याकडे लक्ष द्यावे. (स्थानिक प्रतिनिधी)