शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
4
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
5
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
6
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
7
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
8
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
9
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
10
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
11
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
12
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
13
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
14
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
15
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
16
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
17
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
18
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
19
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
20
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात येणार ‘श्वेतक्रांती’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2020 06:00 IST

लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : जिल्ह्यात शेती करणाऱ्यांची संख्या मोठी असतानाही दुग्ध उत्पादनाकडे दुर्लक्ष होत आहे. मात्र कृषीपुरक व्यवसायांना ...

ठळक मुद्देमदर डेअरी प्रकल्पात समावेश : दुग्ध उत्पादन व संकलनासाठी देणार चालना

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यात शेती करणाऱ्यांची संख्या मोठी असतानाही दुग्ध उत्पादनाकडे दुर्लक्ष होत आहे. मात्र कृषीपुरक व्यवसायांना चालना मिळावी, दुग्ध उत्पादन व संकलनासाठी जिल्ह्यातच पायाभूत सुविधा निर्माण व्हाव्यात, याकरिता २२९ गावांमध्ये राज्य शासन आणि मदर डेअरी फु्रट्स अ‍ॅण्ड वेजीटेबल कंपनीच्या संयुक्त पुढाकारातून लघु प्रकल्प उभारण्यात येणार आहे. हा प्रकल्प प्रामाणिकपणे राबविल्यास जिल्ह्यात ‘श्वेतक्रांती’ येण्याची शेतकऱ्यांना आशा आहे.जिल्ह्यात धान उत्पादक शेतकऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. मात्र मागील पाच वर्षांच्या कालावधीत कापूस व अन्य कडधान्य पिकांच्या लागवडीचे क्षेत्र वाढले. या पिकांसाठी काही प्रमाणाात सिंचनाची सुविधा झाल्याने चाऱ्याची उपलब्धता आहे. परंतु, जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी पारंपरिक शेती करून दुग्ध उत्पादनासारख्या महत्त्वपूर्ण क्षेत्राकडे दुर्लक्ष करीत आहे. अर्थात राज्य शासनाने या क्षेत्राला चालना देण्यासाठी आजपर्यंत ठोस प्रयत्न केले नव्हते. त्यामुळे विदर्भामध्ये सर्वात कमी दुग्ध उत्पादन करणारा जिल्हा म्हणून ओळखल्या जाते. या जिल्ह्यात वर्धा आणि भंडारा जिल्ह्यातून दुधाचा पुरवठा होतो. शेतकºयांची इच्छा असूनही शासनाकडूनही योग्य पाठबळ आणि पायाभूत सुविधा निर्माण करण्यात अपयश आल्यामुळे दुग्ध उत्पादनात हा जिल्हा माघारला. दुग्ध उत्पादनात मागे पडलेल्या जिल्ह्यात मदर डेअरी प्रकल्प सुरू करून त्यासाठी ११ जिल्ह्यातील २ हजार ९३६ गावांचा समावेश विशेष प्रकल्प कार्यक्षेत्रात करण्यात आला. यात जिल्ह्यातील २३९ गावांचा समावेश आहे.तपासणीसाठी येणार तज्ज्ञ समितीमदर डेअरी प्रकल्पांतर्गत समावेश झालेल्या गावांची पाहणी करण्याकरिता तज्ज्ञ समिती लवकरच जिल्ह्यात येणार आहे. पाहणीनंतर जिल्हा प्रशासनाच्या वतीने संबंधित अहवाल राज्य शासनाकडे जाईल. त्यानंतर या प्रकल्पाला चालना मिळणार असल्याची माहिती आहे.

टॅग्स :milkदूध