शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

जलयुक्त शिवार अभियानाची कामे रेंगाळणार

By admin | Updated: November 11, 2015 00:37 IST

येथे लघु सिंचन (जलसंधारण) उपविभाग कार्यालय आहे. मात्र या कार्यालयात कर्मचाऱ्यांचा तुटवडा असल्याने या विभागाद्वारे राबविली जाणारी जलयुक्त शिवार अभियानाची कामे रेंगाळण्याची स्थिती निर्माण झाली आहे.

लघु सिंचन उपविभाग कर्मचाऱ्याविना : शेतकऱ्यांचे नुकसान करण्याचा डावब्रह्मपुरी : येथे लघु सिंचन (जलसंधारण) उपविभाग कार्यालय आहे. मात्र या कार्यालयात कर्मचाऱ्यांचा तुटवडा असल्याने या विभागाद्वारे राबविली जाणारी जलयुक्त शिवार अभियानाची कामे रेंगाळण्याची स्थिती निर्माण झाली आहे.ब्रह्मपुरी लघु सिंचन (जलसंधारण) उपविभागांतर्गत नागभीड, सिंदेवाही व सावली तालुक्याचा समावेश आहे. या विभागाच्या माध्यमातून जलयुक्त शिवार अभियान, कोल्हापुरी बंधारे, सन २०१४ ते २०१९ पर्यंत पूर्ण करावयाचे आहे. परंतु या विभागात पाच शाखा अभियंता पदे मंजूर असताना केवळ एका शाखा अभियंताच्या खांद्यावर ब्रह्मपुरी, नागभीड, सिंदेवाही व सावली तालुक्याचा भार आहे. एक शाखा अभियंता कार्यरत असून ३१ जानेवारी २०१६ ला सेवानिवृत्त होत असल्याने केवळ उपविभागीय अधिकारी शिल्लक सेवेत राहणार आहे. म्हणजे पाचही शाखा अभियंत्यांची पदे येत्या काही काळात रिक्त राहणार असल्याने जलशिवार अभियान व कोल्हापुरी बंधारे कसे तयार करावे, असा प्रश्न उपविभागीय अधिकाऱ्यासमोर उभा ठाकला आहे. शासनाने शेतकऱ्यांसाठी ही योजना सुरू केली आहे. परंतु दुसरीकडे योजनांची पूर्तता करण्यासाठी कर्मचाऱ्यांची पदे भरली जात नसल्याने चारही तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान करण्याचा डाव रचला असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून केला जात आहे. उपविभागीय अधिकाऱ्यांनी वेळोवेळी घेण्यात येणाऱ्या बैठकीला उपस्थित रहावयचे की शाखा अभियंत्याची कामे करायची, असा मोठा प्रश्न उपविभागीय अधिकाऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. ब्रह्मपुरी तालुक्यासह अन्य तालुक्याचे मोठे नुकसान शाखा अभियंत्याच्या रिक्त पदांमुळे होत आहे. शाखा अभियंता पदे भरत नसल्याने हे कार्यालयच बंद पाडण्याची योजना केली असावी असाही सूर व्यक्त केला जात आहे. प्रत्यक्ष ग्रामीण जनतेशी थेट संबंध येत असल्याने या कार्यालयाला साधे निरीक्षण वाहन कायमस्वरूपी नसल्याने कामांना गती मिळत नाही. शासन अनेक योजना सुरू करताना त्या योजना राबविणाऱ्या यंत्रणेचा पर्यायी विचार न केल्याने किंवा या समस्येकडे दुर्लक्ष होत असल्याने शेतकऱ्यांचा रोष अधिकाऱ्यावर काढला जात आहे. शेतकऱ्यांना वरदान ठरणारे जलयुक्त शिवार अभियान व कोल्हापुरी बंधारे शासन व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गांभीर्याने घेऊन चारही तालुक्यातील रिक्त पदे ताबडतोब भरण्याची मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे. (तालुका प्रतिनिधी)