शहरं
Join us  
Trending Stories
1
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
2
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
3
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
4
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
5
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
7
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
8
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
9
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
10
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
11
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
12
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
13
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
14
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
15
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
16
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
17
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
18
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
19
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
20
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
Daily Top 2Weekly Top 5

ब्रह्मपुरीत अनेक घरांत पाणी शिरले

By admin | Updated: July 28, 2014 23:26 IST

ब्रह्मपुरीत सोमवारी सकाळी मुसळधार पाऊस बरसला. तब्बल दोन तास पाऊस कोसळत राहिल्याने ब्रह्मपुरीच्या मध्यवर्ती भागात असलेल्या बारई तलावाची बांध फूटली. त्यामुळे जवळच्या शेषनगरात

बारई तलाव फुटला : ब्रह्मपुरीत दोन तास मुसळधार पाऊसब्रह्मपुरी : ब्रह्मपुरीत सोमवारी सकाळी मुसळधार पाऊस बरसला. तब्बल दोन तास पाऊस कोसळत राहिल्याने ब्रह्मपुरीच्या मध्यवर्ती भागात असलेल्या बारई तलावाची बांध फूटली. त्यामुळे जवळच्या शेषनगरात अनेकांच्या घरात पाणी शिरले. शेषनगर जलमय झाल्याने रस्त्यावरुन येणे-जाणे कठीण झाले होते. ब्रह्मपुरीत सोमवारी सकाळी अचानक पावसाला सुरुवात झाली. तब्बल दोन तास सारखा मुसळधार पाऊस कोसळत राहिला. यापूर्वीही पावसाने परिसरात चांगलाच प्रतिसाद दिला होता. पण सकाळी पडलेला पाऊस मुसळधार होता. या पावसाने शेषनगरला लागून असलेल्या बारई तलावाने कमाल मर्यादा गाढली. तलाव तुडूंब भरले. दरम्यान, शेषनगरजवळील तलावाची बांध फूटली व पाण्याचा पूर शेषनगरमधून वाहू लागला. मागील वर्षी अतिवृष्टी झाल्याने याच ठिकाणावरुन बांध फूटला होता. प्रशासनाने त्यावेळी थातुरमातूर उपाययोजना केली होती. त्याचवेळी गांभीर्यान व अचुक बांध दुरुस्ती केली असती तर पुन्हा यावर्षी हा प्रकार उद्भवला नसता, असे नागरिकांचे म्हणणे आहे. तलावाच्या सभोवताल घनदाट वस्ती उभी झाली आहे. परंतु तलावावरील बांध अनेक वर्षांपासून जसाच्या तसाच कायम आहे. त्यामुळे तलावाची बांध कायमस्वरूपी दुरुस्ती करण्याची मागणी शेषनगर व परिसरातील नागरिकांनी केली आहे.आज कोसळलेल्या मुसळधार पावसाने गणवीर हॉस्पिटलकडे जाणाऱ्या रस्त्यावर दोन ते तीन फूट पाणी साचल्याने नागरिकांना जाणे-येणे करणे कठीण झाले होते. अचानक नागरिकांच्या घरात पाणी शिरणे सुरू झाल्याने नागरिकांची मोठी तारांबळ उडाली. घरातील साहित्य पाण्याखाली आले. दोन तास पडलेल्या पावसाने अनेकांचे मोठे नुकसान केले. विशेष म्हणजे, शेषनगर, शांतीनगर, आनंदनगर, डॉ. आखरे हॉस्पिटल मागील परिसर, नवीन ले-आऊट भागात रस्त्यांची दयनीय अवस्था आहे. आजच्या पावसाने पुन्हा या रस्त्यांची दैना झाली. नगरपालिकेने नवीन भागाचा विकास करावा अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. (प्रतिनिधी)