शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
2
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
3
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
4
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
5
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
6
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
7
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
8
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
9
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
10
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
11
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
12
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
13
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
14
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
15
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
16
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
17
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
18
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
19
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
20
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
Daily Top 2Weekly Top 5

कांदा उत्पादक शेतकरी गोदामाच्या प्रतीक्षेत

By admin | Updated: May 18, 2015 01:11 IST

तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकरी कांद्याचे उत्पादन घेतले असून कांदा साठवणूक करण्यासाठी त्यांचेकडे पर्यायी व्यवस्था नसल्याने ...

पोंभुर्णा : तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकरी कांद्याचे उत्पादन घेतले असून कांदा साठवणूक करण्यासाठी त्यांचेकडे पर्यायी व्यवस्था नसल्याने ओल्या कांद्याची कवडीमोल भावाने विक्री करावी लागत आहे. त्यासाठी कृषी विभागाने संबंधित शेतकऱ्यांना कांदा साठवणुकीसाठी गोदामाची व्यवस्था करून देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.पोंभुर्णा तालुक्यातील डोंगरहळदी, बल्लारपूर, आष्टा, सोनापूर, देवाडा खुर्द आदी गावांमध्ये बऱ्याच प्रमाणात कांद्याची लागवड केली जाते. उत्पादन झाल्यानंतर त्यांंना सुकविण्यासाठी गोदामाची आवश्यकता असते. परंतु बऱ्याच शेतकऱ्यांकडे पर्यायी व्यवस्था नसल्याने ते आपल्याकडे असलेल्या मोजक्या जागेमध्ये कांदे वाळवितात. त्यामुळे कांद्याला पाहिजे तशी पूरक हवा मिळत नाही. परिणामी कांदे सडतात. त्यामुळे त्यांचे मोठे नुकसान होत असते. या त्रासाला कंटाळून अनेकांनी कांदा उत्पादन घेणे टाळले होते. परंतु कृषी विभागामार्फत कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांदा साठवणूक करण्यासाठी ५० टक्के अनुदानावर गोदाम उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे जाहीर केले. त्यामुळे पोंभूर्णा तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी यावर्षी आपल्या शेतामध्ये मोठ्या प्रमाणात कांद्याची लागवड केली आणि गोदामासाठी अनुदान मिळण्यासाठी तालुका कृषी अधिकारी भास्कर गायकवाड यांच्याकडे संपूर्ण आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून अर्ज सादर केले. त्यांनी ते आपल्या स्तरावरुन वरिष्ठांकडे पाठविले. परंतु आजतागायत सहा महिन्यापेक्षा अधिक कालावधी लोटूनसुद्धा गोदाम बांधकाम करण्याच्या अनुदानावर कुठलाच शिक्का मोर्तब न झाल्याने उत्पादीत झालेला कांद्याची साठवणूक कुठे साठवणूक करावी, यासाठी परिसरातील शेतकरी संभ्रमात सापडला आहे.एकीकडे केवळ धान पीक शेतीवर अवलंबून न राहता शेतकऱ्यांनी तालुका कृषी विभागाच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे शेतीला पूरक व्यवसाय म्हणून वेगवेगळ्या पिकांचे उत्पादन घेण्यासाठी प्रयत्न करतात. परंतु आर्थिक अडचणीमुळे पाहिजे त्या प्रमाणात त्यांना सोयी-सुविधा मिळत नसल्याने कष्टकरी ग्रामीण शेतकरी अधोगतीला जात आहे. त्यामुळे शासनाने याकडे लक्ष देऊन कांदा उत्पादक शेतकऱ्यांना गोदामासाठी अनुदान उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे. (तालुका प्रतिनधी)ंपोंभुर्णा तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी गोदाम बांधकाम करण्यासाठी तालुका कृषी कार्यालयात अनुदानासाठी अर्ज केलेला आहे. त्याचे सर्व प्रस्ताव वरिष्ठस्तरावर पाठविण्यात आले आहेत.- भास्कर गायकवाडतालुका कृषी अधिकारी, पोंभुर्णा