शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

गणवेशाला निधीची प्रतीक्षा

By admin | Updated: June 11, 2015 01:22 IST

शाळेच्या नवीन सत्राला २६ जूनपासून प्रारंभ होणार आहे. जिल्हा परिषद, नगर परिषद आणि शासकीय आश्रमशाळांच्या तब्बल एक लाख १२ हजार विद्यार्थ्यांच्या गणवेशाचे नियोजन सर्वशिक्षा अभियानाने केले आहे.

चंद्रपूर : शाळेच्या नवीन सत्राला २६ जूनपासून प्रारंभ होणार आहे. जिल्हा परिषद, नगर परिषद आणि शासकीय आश्रमशाळांच्या तब्बल एक लाख १२ हजार विद्यार्थ्यांच्या गणवेशाचे नियोजन सर्वशिक्षा अभियानाने केले आहे. मात्र, गणवेशाच्या निधीला अंदाजपत्रकात अद्यापही मंजुरी मिळाली नाही. शाळा सुरू होत असल्याने आता विद्यार्थ्यांच्या गणवेशाला निधीच्या मंजुरीची प्रतीक्षा आहे.जिल्हा परिषद, नगर परिषदांतील विद्यार्थ्यांची संख्या गेल्या काही वर्षात झपाट्याने रोडावत चालली आहे. परिणामी या शाळा ओस पडत चालल्या आहेत. या शाळांत विद्यार्थीसंख्या टिकावी, यासाठी विविध शैक्षणिक उपक्रम राबविण्यासोबत विद्यार्थ्यांना मोफत गणवेश, पाठ्यपुस्तके दिली जातात. सर्व मुली, एसटी, एससी समाजाचे मुले आणि बीपीएल पालकांच्या मुलांना दरवर्षी दोन गणवेश देण्याचे नियोजन आहे. गणवेशाला लागणाऱ्या निधीचे अंदाजपत्रक राज्य सरकारकडे पाठविले जाते. त्यानंतर राज्य सरकार गणवेशाचे अंदाजपत्रक केंद्र सरकारकडे पाठविते. त्यानंतर केंद्र सरकार गणवेशाच्या निधीला मंजुरी देते. यंदा फेब्रुवारी-मार्च महिन्यात चार कोटी रुपयांचे गणवेशाचे अंदाजपत्रक सर्वशिक्षा अभियानातंर्गत राज्य सरकारकडे पाठविण्यात आले. राज्याने ते केंद्राकडे लागलीच पाठविले होते. शाळा सुरू होण्यासाठी आता वीस दिवसांचा कालावधी आहे. मात्र, अजूनही गणवेशाच्या बजेटला मंजुरी मिळालेली नाही. त्यामुळे सर्वशिक्षा अभियान राबविणाऱ्यांनाही गणवेशाची चिंता लागली आहे. पहिल्या दिवशी गणवेश मिळतील, असे नियोजन या विभागाने करून ठेवले आहे. मात्र, बजेटला अजूनही मंजुरी मिळाली नाही. त्यामुळे पहिल्या दिवशी तरी गणवेश मिळण्याची आशा धूसर झाली आहे. दरम्यान, लवकरच गणवेशाचा निधी येणार आहे. अंदाजपत्रकाला एक-दोन दिवसात मंजुरी मिळेल, असे सर्वशिक्षा अभियानाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. (शहर प्रतिनिधी)यंदा बसणार भुर्दंडशाळेला आता सुरुवात होत आहे. सध्या पालक शालोपयोगी वस्तू खरेदीच्या मागे आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही गणवेश मिळतील, अशी आशा पालक बाळगून आहेत. अजून निधीच मिळाला नसल्याने यंदाही पैसे देऊन गणवेश खरेदी करावे लागणार आहे.