शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांसाठी मतदार नोंदणी कार्यशाळा

By admin | Updated: October 16, 2016 00:49 IST

चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे मतदार यादीमध्ये नाव समाविष्ठ नाही व १ जानेवारी २०१७ रोजी वयाला १८ वर्ष पूर्ण होत आहे,

चंद्रपूर मनपाचा पुढाकार : लोकशाही हक्काची सनदचंद्रपूर : चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे मतदार यादीमध्ये नाव समाविष्ठ नाही व १ जानेवारी २०१७ रोजी वयाला १८ वर्ष पूर्ण होत आहे, अशा व्यक्तींची मतदार नोंदणी सुरू करण्यात आलेली आहे. त्या अनुषंगाने जनता महाविद्यालयाच्या विद्यार्थी व विद्यार्थिनींची मतदार नोंदणी करण्याबाबत कार्यशाळा आयोजित करण्यात आली.यावेळी अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.सुभाष होते. प्रमुख अतिथी मनपा आयुक्त संजय काकडे, उपायुक्त डॉ. विजय इंगोले व सहायक आयुक्त अश्विनी गायकवाड यांची उपस्थिती होती. गायकवाड म्हणाल्या की, ज्या विद्यार्थी व विद्यार्थिनींचे वय १ जानेवारी २०१७ रोजी १८ वर्ष पूर्ण होत असेल किंवा ज्याचे वय १८ वर्ष पूर्ण झाले असेल, त्यांनी आपली नावे नोंदवावी. तसचे ज्यांच्या नावात व मतदान ओळखपत्रात दुरुस्ती करावयाची असेल तीसुद्धा करून घ्यावी. मतदानाच्या अधिकाराबाबत विद्यार्थी व एन.सी.सी. कॅडेट्सना नावाची नोंद करण्याचे आवाहन अश्विनी गायकवाड यांनी केले.मनपाचे उपायुक्त डॉ. विजय इंगोले यांनी विद्यार्थ्यांना मतदानाचे महत्त्व पटवून दिले. मतदान करणे आपणास आवडेल काय, अशी विचारणा करून लोकशाहीमध्ये मतदानाच्या हक्कामुळे आपल्या आवडीचा लोकप्रतिनिधी निवडता येतो. त्याकरिता मतदार यादीमध्ये नाव समाविष्ट असणे आवश्यक आहे. मतदार यादीत नोंदणी करण्याबाबत विद्यार्थ्यांना त्यांनी आवाहन केले. (प्रतिनिधी)मतदानातूनप्रतिनिधी निवडावामनपाचे आयुक्त संजय काकडे म्हणाले की, मतदानाचे महत्त्व जाणून त्याचा फायदा करून घ्यावा. प्रत्यक लोकसभा, विधानसभा निवडणुकीत ४० ते ५० हजार नवीन मतदार समाविष्ट होतात. त्यात युवकांचे प्रमाण जास्त असते. त्यातही ९० वर्षांचा म्हातारा मतदानाचा हक्क बजावतो. परंतु ३० वर्षाची व्यक्ती मतदान करीत नाही अशांची टक्केवारी ५० टक्के आहे. तुम्हाला तुमच्या शहराचा, महाराष्ट्राचा व देशाचा प्रतिनिधी निवडतांना तुमच्या मतदानाच्या अधिकारातूनच ठरविता येतो, या करिता आपण सर्वांनी तसेच आपल्या कुटुंबातील सदस्यांना व शेजारच्या नागरिकांना मतदार नोंदणी करून घेण्याबाबत कळवावे. मतदानाचा अधिकार प्राप्त करून घ्यावा, असेही त्यांनी सांगितले.