केंद्रीय पथकाला विदारक स्थितीचे दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2020 05:00 AM2020-09-13T05:00:00+5:302020-09-13T05:00:20+5:30

महापुरामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे जिल्हा प्रशासनाने केले आहेत. त्याबाबत प्रत्यक्ष पाहणी करून केंद्र शासनाला अहवाल सादर करण्यासाठी केंद्रीय पथकाद्वारे शुक्रवारी पूरग्रस्त गावांची पाहणी केली होती. शनिवारीदेखील हे पथक लाडज, बेळगाव, किन्ही या गावात धडकले. यावेळी पुरामुळे झालेली विदारक स्थितीचे दर्शन घडले.

A vision of a divisive situation for the Central Squad | केंद्रीय पथकाला विदारक स्थितीचे दर्शन

केंद्रीय पथकाला विदारक स्थितीचे दर्शन

Next
ठळक मुद्देलाडज, बेळगाव, किन्हीला भेट । दुसऱ्या दिवशीही नुकसानीची पाहणी

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : वैनगंगा नदीला आलेल्या पुराने ब्रह्मपुरी तालुक्याला मोठा फटका बसला. घरे, शेतीजमीन, पीक यासोबतच रस्ते, महावितरण आणि जलसंपदा इत्यादी विभागाच्या सार्वजनिक मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. आंतर मंत्रालयीन केंद्रीय पथकाने शनिवारी म्हणजे दुसºया दिवशीसुद्धा ब्रम्हपुरी तालुक्यातील लाडज, बेळगाव, किन्ही या नदीलगतच्या गावात पुरामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला व गावकऱ्यांशी संवाद साधला .
महापुरामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे जिल्हा प्रशासनाने केले आहेत. त्याबाबत प्रत्यक्ष पाहणी करून केंद्र शासनाला अहवाल सादर करण्यासाठी केंद्रीय पथकाद्वारे शुक्रवारी पूरग्रस्त गावांची पाहणी केली होती. शनिवारीदेखील हे पथक लाडज, बेळगाव, किन्ही या गावात धडकले. यावेळी पुरामुळे झालेली विदारक स्थितीचे दर्शन घडले. पथकामध्ये पथक प्रमुख म्हणून राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे सहसचिव जी. रमेशकुमार गांता, तर कृषी मंत्रालयाचे संचालक आर.पी. सिंग, रस्ते व परिवहन विभागाचे अधीक्षक अभियंता तुषार व्यास यांचा समावेश होता.
ब्रह्मपुरी तालुक्यातील लाडज गावातील नीलकंठ लोणारे, विजय मेश्राम, विश्वनाथ कुमरे, विजय नखाते यांच्या शेतात जाऊन झालेल्या पिकाच्या नुकसानीची पाहणी केली. लाडज गावात पुराचे पाणी शिरल्याने गावातील ६० घरे पूर्णत: पडली असून २५ घरे अंशत: पडली तर जनावरांचे १८ गोठे पाण्यात वाहून गेले. त्यासोबतच बेळगाव गावातील सखुबाई वाघदरे, जितेंद्र दिघोरे, रघुनाथ आंबोने, गोपीचंद आंबोने, सेवक बगमारे यांच्या पडलेल्या घराला भेट देऊन पाहणी करण्यात आली.

Web Title: A vision of a divisive situation for the Central Squad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :floodपूर