शहरं
Join us  
Trending Stories
1
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
2
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
3
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
4
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
5
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
6
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
7
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
8
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
9
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
10
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
11
Latest Marathi News LIVE Updates: आमच्यासाठी निवडणूक नाही तर दादांच्या स्मृतींचा यज्ञ - देवेंद्र फडणवीस
12
सामान्य फोनपेक्षा वेगळा! सॅटेलाइट फोन म्हणजे नक्की काय? भारतात बाळगल्यास होऊ शकते थेट जेल
13
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
14
IAS Kinjal Singh : संघर्षातून गाठलं यशाचं शिखर; लहानपणी वडिलांची हत्या, आईचा कॅन्सरने मृत्यू, जिद्दीने झाली IAS
15
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
16
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
17
१० हजार+ धावा, १७५ विकेट्स, पण आयपीएलमध्ये ५ वर्षे बेंचवर बसून राहिला 'हा' अष्टपैलू खेळाडू
18
Narasimha Navratri 2026: नृसिंह नवरात्र विशेष: नऊ दिवस नऊ उपासना; संकटमुक्तीसाठी करा ही विशेष साधना!
19
भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
20
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
Daily Top 2Weekly Top 5

पीडित कुटुंबाच्या मदतीसाठी गावकरी सरसावले

By admin | Updated: June 17, 2017 00:43 IST

कोरपना तालुक्यातील उपरवाही गावातील संजय भाऊराव दुरूटकर यांच्या घरातील स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याची घटना मंगळवारला घडली.

माणुसकीचा हात : सिलिंडर स्फोटातील जखमींना आधारलोकमत न्यूज नेटवर्कगडचांदूर : कोरपना तालुक्यातील उपरवाही गावातील संजय भाऊराव दुरूटकर यांच्या घरातील स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याची घटना मंगळवारला घडली. या घटनेत त्यांची पत्नी ज्योती दुरूटकर (२७) व मुलगी कोमल दुरूटकर (७) गंभीर जखमी झाल्या. सिलिंडरचा स्फोट भीषण असल्यामुळे, घर पूर्णपणे उद्धवस्त झाले. तसेच घरातील संपूर्ण साहित्य जळून खाक झाले. त्यामुळे दुरुटकर कुंटुब पूर्णपणे उघड्यावर आले. मात्र ‘एक हात मदतीचा’ या उपक्रमातून गावकरी त्यांच्या मदतीला धावून आले. एक दानपेटी तयार करुन गावात फिरवून ३९ हजार २४० रुपयांची मदत जमा केली. व ती मदत दुरुटकर परिवारांच्या स्वाधीन केली. संजय दुरूटकर हे उपरवाही येथील अंबुजा सिमेंट कंपनीत ठेकेदारी पद्धतीत मजूर म्हणून काम करतात. त्यांना आठ एकर शेती आहे. नुकतीच खरिप हंगामाला सुरूवात झाली असल्याने त्यांनी शेतीसाठी नातेवाईकांकडून हातउसणे म्हणून एक लाख रुपये आणले होते. ती सर्व रक्कम त्यांनी घरीच ठेवली होती. मंगळवारी सकाळी ६.३० वाजताच्या सुमारास त्यांची पत्नी ज्योती या चबा करत असताना अचानक सिंलिडरचा स्फोट झाला. स्फोट भीषण असल्याने संपूर्ण घराला आग लागली. त्यामुळे घराचे छप्पर पूर्णपणे उडाले. तसेच घरातील आलमारीत ठेवलेले एक लाख रुपये व सोन्याच्या दोन अंगठी, गोप, घरातील दागिने व घरातील धान्य, घरघूती साहित्य जळून खाक झाले. आई व मुलगी जखमी झाल्या. या घटनेने दुरुटकर कुंटुब पूर्णपणे उघड्यावर आले. मात्र उपरवाही गाववासियांनी ‘एक हात मदतीच्या’ या उपक्रमातून दुरुटकर कुटुंबीयाच्या मदत पेठ्या तयार करुन बुधवारला गावामध्ये फिरुन दुरुटकर कुंटुबासाठी मदत मागितली. यावेळी गावकऱ्यांनी सढळ हाताने मदत केली. त्यामुळे या उपक्रमातून ३९ हजार २४० रुपयांची मदत गोळा केली. ती संपूर्ण मदत दुरुटकर परिवारांच्या स्वाधीन करुन दुरुटकर परिवाराला दिलासा दिला. या उपक्रमात संपूर्ण सुभाष बुराण, नंदकिशोर बावने, मारोति पानघाते, समाधन बल्कि, अशोक निखादे, मधूकर येवले, एकनाथ गोहोकार, वासूदेव बोंडे, बाळू मत्ते, निलकंठ कोंगरे, हरिदास पांगघाते, लोनगाडगे यांनी गावात फिरुन निधी गोळा केला.