नांदा येथील युवकांची ग्राम स्वच्छता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 04:40 IST2020-12-14T04:40:08+5:302020-12-14T04:40:08+5:30

लखमापूर : आपले गाव स्वच्छ व सुंदर ठेवण्याच्या उद्देशाने नांदा येथील रुद्रा स्पोर्टिंग क्लबच्या युवकांनी गावातील मुख्य रस्त्याची स्वच्छता ...

Village cleaning of youth at Nanda | नांदा येथील युवकांची ग्राम स्वच्छता

नांदा येथील युवकांची ग्राम स्वच्छता

लखमापूर : आपले गाव स्वच्छ व सुंदर ठेवण्याच्या उद्देशाने नांदा येथील रुद्रा स्पोर्टिंग क्लबच्या युवकांनी गावातील मुख्य रस्त्याची स्वच्छता केली. यावेळी रस्त्यावरील प्लास्टिक, कचरा गोळा करुन त्याची विल्हेवाट लावण्यात आली.

जिल्ह्यात कोरोनासह, टायफाईड, डेंग्यू आदी रोगांने थैमान घातले आहे. अस्वच्छतेमुळे रोगराई पसरु नये तसेच आपले गाव स्वच्छ व सुंदर राहावे या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमात रविंद्र चिंचोलकर, संतोष मडावी, प्रफुल्ल विरुटकर, गणेश लोंढे, योगेश वडेकर, यांच्या मार्गदर्शनात सचिन राऊत, राहुल पाचभाई, योगेश मुळे, रोशन खोके, प्रफुल्ल उरकुडे, सहिल गायकवाड, ऋषभ पानघाटे, पियुष बावणे, आयुष हुनुमाते, गणेश काटे, ओम भोंगळे, तन्मय लाड, विनीत निकुरे, ओमकार निब्रड, अभिषेक उरकुडे, शुभम पाचभाई, पवन धुमने, आशिष पानघाटे, पवन नुसटवार, हिमांशु गायकवाड, ऋतिक भोबळे, रितेश आत्राम, अभिषेक टेकाम, प्रणव मुसळे आदी सहभागी झाले होते.

Web Title: Village cleaning of youth at Nanda