वेकोलिचे स्फोट विधानसभेत गाजले

By Admin | Updated: April 6, 2016 00:48 IST2016-04-06T00:48:40+5:302016-04-06T00:48:40+5:30

तालुक्यातील वेकोलिच्या गोवरी कोळसा खाणीत होणारे शक्तिशाली स्फोट मंगळवारी विधानसभेत गाजले.

The Vaolocli blast took place in the Assembly | वेकोलिचे स्फोट विधानसभेत गाजले

वेकोलिचे स्फोट विधानसभेत गाजले

खनिकर्म मंत्र्यांनी घेतली दखल : जिल्हाधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश
राजुरा: तालुक्यातील वेकोलिच्या गोवरी कोळसा खाणीत होणारे शक्तिशाली स्फोट मंगळवारी विधानसभेत गाजले. ‘लोकमत’च्या वृत्ताची दखल घेत राजुराचे आमदार अ‍ॅड. संजय धोटे यांनी यासंदर्भात विधानसभेत प्रश्न उपस्थित केला. त्यावर खनिकर्म मंत्र्यांनी या विषयात चंद्रपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश देण्यात येत असल्याचे जाहीर केले.
प्रश्नावरील चर्चेच्यावेळी आ. धोटे यांनी खनिकर्म मंत्री सुरेश मेहता यांना गोवरी कोळसा खाणीत होत असलेल्या शक्तिशाली स्फोटाबाबत माहिती दिली.
वेकोलिच्या अधिकाऱ्याकडून दिशाभूल करणारी माहिती दिली जात असल्याचा आरोपही यावेळी आ.संजय धोटे यांनी केला. या स्फोटाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणीदेखील त्यांनी यावेळी केली. सोबतच ‘लोकमत’ मधून प्रकाशित झालेल्या वृत्ताचा संदर्भ दिला. खनिकर्म मंत्री सुरेश मेहता यांनी याप्रकरणाची चौकशी चंद्रपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांमार्फत करण्यात येईल, असे आश्वासन दिले. (शहर प्रतिनिधी)

Web Title: The Vaolocli blast took place in the Assembly