शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण : ..तोपर्यंत कुठल्याही राजकारण्याने माझ्या घरी येऊ नये;पीडित मुलीच्या वडिलांनी स्पष्टच सांगितले
2
Devendra Fadnavis : "मुलीच्या वडिलांचे आभार, त्या नराधमाला कायद्याने मृत्युदंडाची शिक्षा द्यायचीय!", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्धार
3
थरार! मुलाला उडवलं अन् वडिलांना २ किमी बोनटवर फरफटत नेलं; हैदराबादमधील 'हिट अँड रन'ने देश हादरला!
4
Video - रीलसाठी पाण्याच्या टाकीवर चढले, शिडी तुटल्याने १६ तास अडकले; एकाचा मृत्यू, २ जखमी
5
पंधराशेच्या बदल्यात लेकींवर अत्याचार करण्याचा अधिकार कुणाला दिलाय का? राऊतांचा सरकारला सवाल
6
Video: अजब शॉट! तिलक वर्माने जोरात फटका मारला अन् चेंडूच्या जागी महागडं घड्याळच उडालं...
7
चेन्नई विमानतळावर थरार! धावत्या विमानातून प्रवाशाची उडी; प्रशासनाची उडाली झोप
8
२ किलो सोनं, १५ हिंस्त्र कुत्रे, १५ गोल्ड लोन खाती; अंथरुणात लपलेल्या मोलकरणीचा पर्दाफाश
9
"पप्पा, जगणं अवघड झालंय...", वडिलांना फोन; न्यायाधीशाने संपवलं आयुष्य, पत्नीवर गंभीर आरोप
10
"देवाभाऊंच्या राज्यात ना लाडकी बहीण सुरक्षित, ना ३-४ वर्षांची बालिका"; काँग्रेसची बोचरी टीका
11
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
12
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
13
"या नराधमाचा हा तिसरा गुन्हा, आधी दोनदा जामीन कसा मिळाला?"; सुप्रिया सुळेंचा यंत्रणेला सवाल
14
दहीवडा खाल्ल्यानंतर उलट्या आणि ताप; २७ मुलांसह ५८ जणांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल
15
समोरासमोर आले नागा चैतन्य अन् समंथा? रिसेप्शन पार्टीला आपापल्या पार्टनरसोबत लावली हजेरी
16
Delhi Fire: दिल्लीत अग्नितांडव! एसीचा स्फोट होऊन भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू
17
हे काय नवीन? मोस्ट एलिजिबल बॅचलर आदित्य रॉय कपूरला डेट करतीये तारा सुतारिया, चर्चांना उधाण
18
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
19
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
20
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळी वादळी पावसाचा पिकांना तडाखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2020 05:00 IST

शेतकऱ्यांना नेहमीच निसर्गाच्या लहरीपणामुळे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. आता निसर्गासोबत कोरोनाही शेतकऱ्यांच्या आर्थिक नुकसानीला हातभार लावत आहे. यावर्षी पावसाळ्याच्या सुरूवातीला रोहिण्या बरसल्या नाहीत. मृग नक्षत्रातही पाऊस वेळेवर आला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी कर्ज काढून बियाण्याची खरेदी करून लागवड केली. त्यानंतरही अनेक भागात कमी पाऊस झाला.

ठळक मुद्देशेतकरी चिंतेत : सर्वेक्षण करून तात्काळ भरपाई मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोना विषाणूने सर्वत्र थैमान घातल्याने लॉकडाऊन सुरू आहे. शेतकरी रब्बी हंगामातील भाजीपाला व अन्य पिकांची काळजी घेत असतानाच गुरूवारी जिल्ह्यात विविध ठिकाणी अकाली वादळी पावसाने झोडपल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. लॉकडाऊन असल्याने रब्बी हंगामातील कापसाची विक्री कुठे करायची, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे.शेतकऱ्यांना नेहमीच निसर्गाच्या लहरीपणामुळे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. आता निसर्गासोबत कोरोनाही शेतकऱ्यांच्या आर्थिक नुकसानीला हातभार लावत आहे. यावर्षी पावसाळ्याच्या सुरूवातीला रोहिण्या बरसल्या नाहीत. मृग नक्षत्रातही पाऊस वेळेवर आला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी कर्ज काढून बियाण्याची खरेदी करून लागवड केली. त्यानंतरही अनेक भागात कमी पाऊस झाला. सोयाबीन, कापूस या खरीप पिकांचे आॅक्टोबर-नोव्हेंबरच्या अतिवृष्टीमुळे नुकसान झाले. शेतकºयांना रब्बी पिकाच्या उत्पादनाची आशा होती. पीकही चांगले आले. ऐन पीक काढणीला आले असताना, मार्च अखेरीस कोरोनाने देशात धुमाकूळ घातला. हंगामातील गहू, हरभरा या पिकांची विक्री कुठे करायची, असा प्रश्न आता शेतकºयांसमोर आहे.कपाशी पेरा घटणारखरीप हंगाम तोंडावर येऊन ठेपला असून पेरणीपूर्व मशागतीला वेग आला आहे. यंदा जिल्ह्यात कपाशीचा पेरा घटण्याची चिन्हे दिसत आहेत. सोयाबीन, तूर व इतर पिकांचा पेरा अधिक वाढणार असल्याचे चित्र आहे. शेतकरी मशागतीच्या कामात व्यस्त आहे. गतवर्षी गारपीट व अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात घट झाली होती. संकटावर मात करीत यंदा खरीप तयारीसाठी शेतकरी कामाला लागला आहे. शेतांमध्ये खरिपासाठी ट्रॅक्टरद्वारे नांगरणी व मजुरांद्वारे कोळपणी करण्याची कामे सुरू आहेत. रब्बीचा हंगाम अंतिम टप्प्यात असल्याने मजूर कामात व्यस्त आहेत. बँकेच्या नियमित कर्जदारांना पीक कर्जाचे वितरण एप्रिलच्या पहिल्या तारखेपासूनच वितरणाला सुरुवात झाली आहे. शेतकऱ्यांकडे पेरणीसाठी लागणारा पुरेसा निधी उपलब्ध नाही. त्यामुळे केंद्र व राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेज जाहीर करणे गरजेचे झाले आहे.धान, गहू उत्पादनात घटजिल्ह्यातील काही तालुक्यात अतिवृष्टी झाली होती. त्यामुळे धान, सोयाबीन उत्पादन घटले. गहू पिकावर अळीचा प्रादुर्भाव झाल्याने खर्चाच्या तुलनेत उत्पन्न झाले नाही. गव्हाची शेती तोट्यात गेल्याने खर्चाचा मेळ घालणे कठीण झाले आहे.कापूस घरात पडूनशेतकऱ्यांनी भाव कमी असल्यामुळे अद्याप कापूस विकला नाही. भाव वाढतील, या आशेवर शेतकऱ्यांनी कापूस घरात साठवून ठेवला. मात्र, लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. घरात ठेवलेल्या कापसाची विक्री कशी करायची, असा प्रश्न उभा ठाकला आहे.

टॅग्स :RainपाऊसFarmerशेतकरी