शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
2
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
3
Top Marathi News LIVE Updates:राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक
4
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
5
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
6
धक्कादायक! घरातच बलात्कार करुन मोबाईल चार्जरने गळा आवळला; दिल्लीत IRS अधिकाऱ्याच्या मुलीसोबत अमानवीय कृत्य
7
लाज आणली रे लाज आणली! हॉटेल कर्मचाऱ्यांनी सुटकेस उघडायला लावली, बालीमध्ये भारतीयांच्या चोरीचा Video व्हायरल
8
Jara Hatke: बिस्किट चहात बुडवून खायचं हे ठरवलं कुणी? कशी होती बिस्किटांची मूळ चव? माहितीय?
9
इराणला दररोज ४१०० कोटींचा फटका, तरीही चर्चेला आला नाहीय! डोनाल्ड ट्रम्प यांचे 'अखेरचे शस्त्र' ठरणार निर्णायक?
10
पेट्रोल-डिझेल विसरा, आता १००% इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्या; नितिन गडकरी नेमकं काय म्हणाले?
11
विजय केडियांनी खरेदी केले 'या' कंपनीचे ४४ लाख शेअर्स, स्टॉकला लागलं अपर सर्किट; ५ वर्षांत २१००% चा रिटर्न
12
"जिंकाच, अन्यथा पर्याय नाही.."; एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची सत्तेची ‘पॉवर ब्लूप्रिंट’ तयार
13
अमरावती लैंगिक शोषण प्रकरण: मुख्य आरोपी अयान अहमदची अचलपूर शहरातून धिंड; गुन्ह्यातील पुराव्यांचा शोध सुरू
14
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
15
गुरुवारी गुरुपुष्यामृत योग: आवर्जून स्वामी सेवा करा; मनातील इच्छापूर्ती, अशुभता दूर होईल!
16
डोळ्यांवर पट्टी, हात-पाय बांधले... वेस्टर्न स्टाईल प्रपोजच्या बहाण्याने बॉयफ्रेंडला जिवंत जाळलं
17
कर्नाटकात होमस्टेमध्ये अमेरिकन महिलेवर अत्याचार; मालकाने तीन दिवस वायफाय बंद ठेवले, कर्मचाऱ्यालाही अटक
18
भाजप महिला आरक्षणाची सिरियल किलर, सामान्य महिलेने दाखवला खरा आक्रोश, वडेट्टीवार यांचा टोला
19
इराणला मिळाले नवे 'अण्वस्त्र'; अमेरिकेचीही पंचाईत, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून ताबा घेण्याचा प्रयत्न
20
न्यूड व्हिडीओ कॉलसाठी २० हजार दे; अभिनेत्रीचे विद्यार्थ्यासोबतचे अश्लील चॅट व्हायरल, सोशल मीडियावर खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

वीज केंद्रातील अनधिकृत संरक्षक भिंत पाडा

By admin | Updated: December 16, 2014 22:51 IST

चंद्रपूर येथे महाऔष्णिक विद्युत केंद्राची निर्मिती होण्याच्या अनुषंगाने या मार्गावरील दुर्गापूर येथील ९६.५७, ऊर्जानगर १५.७२ कोंडी (माल) २००.५८, कोंडी चक १८१.९९, नेरी १०५.४२ तसेच रानवेंडली

निवेदन सादर : राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसची मागणीचंद्रपूर : चंद्रपूर येथे महाऔष्णिक विद्युत केंद्राची निर्मिती होण्याच्या अनुषंगाने या मार्गावरील दुर्गापूर येथील ९६.५७, ऊर्जानगर १५.७२ कोंडी (माल) २००.५८, कोंडी चक १८१.९९, नेरी १०५.४२ तसेच रानवेंडली येथील २००.२५ हेक्टर जमीन प्रकल्पाकरिता घेण्यात आली होती. तसेच राज्य महामार्ग २६१ ला शेवटची सीमा ग्राह्य धारुन सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून संरक्षक भिंत बांधण्यात आली होती. परंतु आज या सर्व प्रक्रियेला ३० वर्षाहून अधिकचा काळ लोटला आहे. मधल्या काळात शासनाने अनेक कायदे व धोरणात बदल केले आहे. येथील वीज केंद्राची अनाधिकृत संरक्षक भिंत ताबडतोब पाडण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंताना दिले.महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम मंत्रालयामार्फत मुंबई महामार्ग अधिनियम १९५५, महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६९ प्रमाणे नियंत्रण रेषेसंदर्भात ९ मार्च २००१ ला एक धोरण आखण्यात आले. राज्य महामार्ग व प्रमुख राज्य महामार्ग यांच्या धोरणाप्रमाणे नागरी व औद्योगिक परिसर असल्यास रस्त्याच्या मध्यभागापासून २० मीटर तसेच अनागरी भाग असल्यास रस्त्याच्या मध्यभागापासून किमान ४० मीटर अंतरापर्यंत कोणतेही बांधकाम करता येत नाही. परंतु चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रामार्फत बांधण्यात आलेली संरक्षक भिंत ही राज्य महामार्ग क्रं. २६१ या रस्त्याच्या मध्यभागातून सरासरी १० मीटर अंतरावर रस्त्यावर येत असून अनाधिकृत असल्याचे निष्पन्न झाले आहे. ऊर्जानगर ग्रामपंचायतीनेसुद्धा अनाधिकृत संरक्षक भिंत पाडण्याचा सर्वानुमते ठराव घेतला. चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राने शासनाच्या धोरणानुसार नव्याने सरक्षक भिंतीचे बांधकाम केल्यास या परिसरात बाजारपेठेकरिता मुख्य मार्गावर मोठ्याप्रमाणात जागा उपलब्ध होईल व त्यामुळे गावातील अनेक सुशिक्षित बेरोजगार तरुण तसेच गरीब कुटुंबांना उदररनिर्वाह करण्याच्या अनुषंगाने किरकोळ व्यवसाय करता येणार आहे. म्हणून सामान्य व गरीब नागरिकांच्या अनधिकृत बांधकामावर करण्यात येणाऱ्या कारवाई प्रमाणेच चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राच्या या अनधिकृत संरक्षक भिंत तातडीने पाडण्याची कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर, रायुकॉं शहर जिल्हाध्यक्ष गजानन पाल, जिल्हा उपाध्यक्ष अमोल ठाकरे, प्रदीप रत्नपारखी, राविकॉं शहर जिल्हाध्यक्ष सुजीत उपरे, संजय ठाकूर, नितीन रत्नपारखी, पवन मेश्राम, शैलेंद्र बेलसरे, नितीन घुबडे, रोशन शेख, आदींनी केली. (प्रतिनिधी)