चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार

By राजेश भोजेकर | Updated: June 15, 2025 10:18 IST2025-06-15T10:17:43+5:302025-06-15T10:18:57+5:30

गडचिरोली जिल्ह्यातून चंद्रपूर जिल्ह्यात आलेल्या रानटी हत्तींनी घेतला पहिला बळी

Two wild elephants killed father of 5 children by hitting him with their trunks in chandrapur | चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार

चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार

चंद्रपूर: सिंदेवाही तालुक्यातील जाटलापूर मोठा येथील एका इसमाला दोन हत्तीनी सोंडेने आपटून जागीच ठार केले. यानंतर हत्ती जंगलाच्या दिशेने निघून गेले. ही थरारक घटना रविवारी सकाळी ६.३० वाजताच्या सुमारास घडली. मारोती मसराम असे मृतकाचे नाव आहे. मारोतीला पाच मुले आहेत. आज फादर्स डेच्या दिवशी ही घटना घडली. या दिवशी पाच मुले वडिलाला पोरके झाल्याचे बोलले जात होते.

मारोती गावालगत सकाळी शौचास गेला होता. अशातच दोन हत्ती तेथे आले. मारोती अचानक उभा झाला. अशातच हत्तीने मारुतीला सोंडेत पकडून हवेत फिरवून जमिनीवर आपटून ठार मारले. मागील काही दिवसांपासून गडचिरोली जिल्ह्यातील दोन हत्ती चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुका, त्यानंतर सिंदेवाही तालुक्यात फिरत आहे. या हत्तींमुळे शेतकऱ्यांचेही नुकसान झाले आहे. वनविभाग या हत्तींच्या हालचालीवर लक्ष ठेवून असल्याचे सांगत असला तरी रविवारी सकाळी या हत्तीने जिल्ह्यात पहिला बळी घेतला आहे. गावातील मजुरवर्ग सकाळी मनरेगाच्या कामावर जाणार होता. मात्र हत्तीच्या भीतीने त्यांनी कामावर जाणे टाळले. या घटनेचा अधिक तपास वनविभाग करीत आहेत.

Web Title: Two wild elephants killed father of 5 children by hitting him with their trunks in chandrapur