तृतीयपंथीयांसाठी झटणाऱ्या योद्धांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 04:41 IST2020-12-13T04:41:47+5:302020-12-13T04:41:47+5:30

राष्ट्रवादी युवती कॉंग्रेस : सन्मान माणुसकीचा उपक्रम फोटो : सत्कारमूर्तीसोबत ॲड. मेघा रामगुंडे व अन्य. चंद्रपूर : शहरातील तृतीयपंथीयांच्या ...

A tribute to the warriors who fought for the third party | तृतीयपंथीयांसाठी झटणाऱ्या योद्धांचा सत्कार

तृतीयपंथीयांसाठी झटणाऱ्या योद्धांचा सत्कार

राष्ट्रवादी युवती कॉंग्रेस : सन्मान माणुसकीचा उपक्रम

फोटो : सत्कारमूर्तीसोबत ॲड. मेघा रामगुंडे व अन्य.

चंद्रपूर : शहरातील तृतीयपंथीयांच्या समस्या सोडविण्यासाठी झटणाऱ्या योद्धांचा राष्ट्रवादी युवती काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश व चंद्रपूर शहरच्या वतीने सत्कार करण्यात आला. संबोधन ट्रस्टच्या माध्यमातून तृतीयपंथीसांना समाजात स्थान मिळवून देण्यासाठी झटणारे राज निरुती काचोडे, आरती यादवराव गंगोत्री यांचा ‘सन्मान माणुसकीचा’ या नावाने सन्मानपत्र सन्मानचिन्ह व पुष्पवृक्ष देऊन सन्मान करण्यात आला.माजी मुख्यमंत्री लोकनेते शरदचंद्र पवार यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात नागपूर विभागीय अध्यक्ष ॲड मेघा रामगुंडे, राष्ट्रवादी युवती काँग्रेस शहराध्यक्ष प्रज्ञा पाटील, उपाध्यक्ष अश्विनी तालापल्लीवार, महासचिव स्वाती दुर्गमवार, सचिव वर्षा बामणवाडे, अनुष्का कुमार, ऋतुजा कामतकर आदी उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना, ॲड. मेघा रामगुंडे म्हणाल्या, तृतीयपंथांना नेहमीच समाजात हिन दर्जाची वागणूक दिली जाते. त्यांच्या अस्तीत्वासाठी संबोधन ट्रस्टचे राज काचोडे व आरती गंगोत्री कार्य करीत आहेत. ही गौरवास्पंद बाब आहे. तृतीयपंथीयांच्या समस्या सोडविण्यासाठी राष्ट्रवादी युवती कॉंग्रेस प्रयत्न करेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी दिली. राज काचोडे व आरती गंगोत्री हे मागील दहा वर्षांपासून तृतीयपंथीसाठी काम करीत करुन एड्सबाबत जनजागृती करणे, शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून देणे, तृतीयपंथीयांच्या कौशल्याचा विकास करण्यास मदत करणे आदी कामे करीत असल्याने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी युवती कॉंग्रेसचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

Web Title: A tribute to the warriors who fought for the third party