वाहतूक पोलिसांना दिवाळी भेट

By Admin | Updated: November 16, 2015 01:01 IST2015-11-16T01:01:58+5:302015-11-16T01:01:58+5:30

दिवाळी व अन्य सणामध्ये सुट्या न घेता वाहतूक व्यवस्थेकरिता योगदान देणाऱ्या वाहतूक पोलिसांना चंद्रपूर बचाव संघर्ष समितीच्या वतीने दिवाळीच्या दिवशी मिठाई वाटप करण्यात आली.

The traffic police visit Diwali | वाहतूक पोलिसांना दिवाळी भेट

वाहतूक पोलिसांना दिवाळी भेट

कामाचे केले कौतुक : चंद्रपूर बचाव संघर्ष समितीचा उपक्रम
चंद्रपूर : दिवाळी व अन्य सणामध्ये सुट्या न घेता वाहतूक व्यवस्थेकरिता योगदान देणाऱ्या वाहतूक पोलिसांना चंद्रपूर बचाव संघर्ष समितीच्या वतीने दिवाळीच्या दिवशी मिठाई वाटप करण्यात आली.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस अधिक्षक संदीप दिवाण होते. त्यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. चंद्रपूर बचाव संघर्ष समिती करीत असलेल्या सामाजिक कार्याची स्तुती केली.
पोलीस विभागातर्फेसुद्धा मिठाईचे वाटप करण्यात आले. चंद्रपूर बचाव संघर्ष समितीचे अध्यक्ष डॉ. गोपाल मुंधडा यांनी समितीच्या कार्याची माहिती दिली व सर्वांचे स्वागत केले. डॉ. राजीव देवईकर यांनी प्रास्ताविक केले. दत्त प्रसन्न महादानी यांनी आभार मानले. डॉ. जुगल सोमानी यांनी कार्यक्रमाचे संचालन केले. वाहतूक पोलीस निरीक्षक कोली व चंद्रपूर बचावचे रूंगठा, सुबोध कासुलकर, सुहास अलमस्त, अ‍ॅड. शाकिर मलिक, साजिद कुरेशी, डॉ.सपन दास, अनिल मेघडा, रूंगठा, रोडमल गहलोत, राममिलन सोनका, सुधाकर कावडे, शिशीर हलधर, चंद्रशेखर नंदनवार आदींचे सहकार्य लाभले. (शहर प्रतिनिधी)

Web Title: The traffic police visit Diwali