शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

आज नदी पूजनाने होणार जल सप्ताहाला प्रारंभ

By admin | Updated: March 16, 2016 08:35 IST

पाण्याचे महत्त्व पटवून देण्यासाठी १६ मार्च ते २२ मार्चदरम्यान जिल्ह्यात जल सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून या निमित्त विविध कार्यक्रम होणार आहेत.

जिल्ह्यात विविध कार्यक्रम : २० मार्चला जल दौडचंद्रपूर : पाण्याचे महत्त्व पटवून देण्यासाठी १६ मार्च ते २२ मार्चदरम्यान जिल्ह्यात जल सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून या निमित्त विविध कार्यक्रम होणार आहेत. १६ मार्च रोजी विविध नद्यांच्या जलाचे पूजन करण्यात येणार असून २० मार्च रोजी जटपुरा गेट ते गांधी चौक जलदौड आयोजित करण्यात आली आहे. या सप्ताहाचा समारोप २२ मार्च रोजी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थित होणार आहे.१६ मार्चला जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर यांच्या हस्ते उद्घाटन व विविध नद्यांच्या जलाचे पूजन, स्मरणिका प्रकाशन, विभागवार सादरीकरण, चित्ररथास हिरवी झेंडी दाखविणे आदी कार्यक्रम दाताळा मार्गावरील इरई नदी पुलाजवळील बालाजी मंदिरालगत सकाळी ८ वाजता होणार आहे.१७ ते २१ मार्च पाण्याची बचत व महत्व याबाबत चर्चासत्रे, पाणी वापर संस्थेचे महत्त्व, कार्यशाळा व माहिती देणे तसेच चित्ररथाद्वारे जलजागृती, जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील गावात जलदिंडी, निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा अशा विविध कार्यक्रमाद्वारे जिल्हयात विविध तालुकास्तरावर व व्यापक स्वरूपात जलजागृती करण्यात येणार आहे. २० मार्चला सकाळी जलजागृती जलदौडीचे आयोजन सकाळी ७.३० वाजता करण्यात आले आहे. ही दौड जटपूरा गेट ते गांधीचौक व पुन्हा जटपूरा गेट या मार्गाने होईल. या जलदौडमध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.२२ मार्चला जलसाक्षरता सांस्कृतिक कार्यक्रम, जलजागृती सप्ताहाचे सादरीकरण, बक्षीस वितरण व समारोप पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत स्थानिक प्रियदर्शनी सभागृहात दुपारी २ वाजतापासून आयोजित करण्यात आले आहे.या सप्ताहात नागरिकांनी मोठया संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता जे.एम. शेख, कार्यकारी अभियंता राजेश सोनुने, कार्यकारी अभियंता खडकी व कार्यकारी अभियंता ए.बी. भाले यांनी केले आहे. (प्रतिनिधी) २२ मार्च हा दिवस जागतिक जलदिन म्हणून साजरा केला जातो. त्याचे औचित्य साधून प्रतिवर्षी १६ ते २२ मार्च हा सप्ताह संपूर्ण राज्यात जल जागृती सप्ताह म्हणून साजरा करण्याचे शासनाने ठरविले आहे. राज्यात पाण्यासंबंधी कार्यरत असलेल्या कृषी, पाणी पुरवठा, उद्योग, पर्यावरण, ग्रामविकास व नगरविकास या सर्व विभागांमार्फत जलजागृतीबाबत विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. राज्यात एकात्मिक पाणी नियोजन, सिंचन प्रकल्पाची उभारणी व सिंचन व्यवस्थापन ही महत्त्वाची जबाबदारी जलसंपदा विभागावर असल्यामुळे जल जागृती सप्ताहामध्ये जास्तीत जास्त लाभार्थ्यांशी संपर्क करून समाजात जल साक्षरता-जागृती निर्माण करण्याची जबाबदारी जलसंपदा विभागावर आहे. त्यानुषंगाने चंद्रपूर जिल्हा जल जागृती सप्ताहामध्ये जलसंपदा विभागामार्फत कार्यक्रम आखले आहेत.