शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
4
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
5
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
6
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
7
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
8
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
9
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
10
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
11
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
12
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
13
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
14
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
15
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
16
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
17
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
18
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
19
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
20
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
Daily Top 2Weekly Top 5

तंबाखुजन्य पदार्थाने कर्करोगाचा धोका

By admin | Updated: March 25, 2015 01:28 IST

ग्रामीण भागातील जिवनशैली, लोकांचे वेसन, मुखाचे वाढते आजार, तंबाखुजन्य पदार्थ सेवनाचे वाढत चाललेले व्यसन यातून मुखाचा कर्करोग होण्याची शक्यता आहे.

चंद्रपूर: ग्रामीण भागातील जिवनशैली, लोकांचे वेसन, मुखाचे वाढते आजार, तंबाखुजन्य पदार्थ सेवनाचे वाढत चाललेले व्यसन यातून मुखाचा कर्करोग होण्याची शक्यता आहे. याबाबत नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात जाणीव जागृती करण्याची आवश्यकता असल्याचे मत जिल्हा परिषद अध्यक्षा संध्या गुरुनुले यांनी व्यक्त केले. राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हा सामान्य रुग्णालय व मौखिक आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा सामान्य रुग्णालयात जागतिक मौखिक आरोग्य दिन सप्ताह सुरु आहे. यावेळी घेण्यात आलेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. या निमित्ताने मौखिक आरोग्याबद्दल शालेय विद्यार्थी व गरोदर महिलांमध्ये तसेच नागरिकांमध्ये मौखिक आरोग्य विषयी जनजागृती करण्यात आली.मुलांसाठी ब्रश करण्याची योग्य पद्धत, निबंध स्पर्धांमार्फत जनजजागृती केली जाणार असून गरोदर मातांसाठी विशेष प्रशिक्षण व आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केली जाणार आहे. यावर्षी जागतिक मौखिक आरोग्य दिनाचे घोष वाक्य ‘स्माईल फॉर लाईफ’ असे आहे. व्यक्तीने जिवनात सतत आनंदीत व हसत राहावे. त्यामुळे सकारात्मक वैचारिक दृष्टीकोन निर्माण होवून व्यक्तीचे जीवन आरोग्यपूर्ण राहण्यास मदत होते. या कार्यक्रमात लोकांना मुख व दन्त आरोग्य विषयी माहिती देवून लोकांना जागृत करण्यात आले. मार्गदर्शक म्हणून दंत रोगतज्ज्ञ डॉ. संदीप पिपरे यांनी मुखाची व दाताची रचना, मुख व जागतिक मुख आरोग्य दिन सप्ताह शिबिराचे आयोजन करुन लोकांना जागृत करुन उपचार देवू असे सांगितले. नागरिकांना मुखाचे आरोग्य विषयी असलेले अज्ञान आणि बदल्यात सवयीमुळे आजाराचे वाढते प्रमाण याविषयी त्यांनी मार्गदर्शन केले. सप्ताह निमित्ताने वेगवेगळ्या स्तरातील नागरिकांकरिता जनजागृती कार्यक्रम आयोजित करुन उपचार सेवा देण्याचे आश्वासन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मुरंबीकर यांनी दिले. आभार जिल्हा कार्यक्रम अधिकारी डॉ. सोना देशमुख यांनी केले. (नगर प्रतिनिधी)