शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
2
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
3
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
4
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
5
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
6
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
7
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
8
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
9
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
10
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
11
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
12
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
13
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
14
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
15
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
16
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
17
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
18
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
19
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
20
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
Daily Top 2Weekly Top 5

अल्ट्राटेकच्या वसाहतीत शिरला वाघ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2020 06:00 IST

या तोफेपासून वाघाने उडी मारली. आणि झुडुपामध्ये गेला. त्यावेळी तिथे उपस्थित असलेल्या कर्मचा:यांनी व सुरक्षारक्षकांनीसुद्धा वाघ बघितला. एका युवकाने तर वसाहतीत असलेल्या वाघाचा चक्क व्हिडीओच काढला. हा व्हिडीओ संपूर्ण परिसरात व्हायरल झाला असून वाघ असल्याचे निष्पन्नसुद्धा झाले आहे. याची माहिती सर्वप्रथम पोलिसांना आणि त्यानंतर वनविभागाला देण्यात आली.

आशिष देरकर। लोकमत न्यूज नेटवर्ककोरपना : कोरपना तालुक्यातील अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेडमधील वसाहतीत शनिवारी एक पट्टेदार वाघ शिरला. यामुळे एकच धावपळ उडाली. सध्या नागरिक वाघाच्या दहशतीखाली आहेत. शनिवारी अनेक कामगारांना वाघाचे दर्शन झाले असून जंगल नसतानाही वसाहतीत वाघ शिरल्याने परिसरामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दीड वर्षापूर्वी याच वसाहतीत बिबट शिरला होता. वन विभागाच्या कर्मचा:यांनी त्याला जेरबंद केले होते. तीन शिफ्टमध्ये कामगार या वसाहतीतून कंपनीमध्ये जाण्याकरिता ये-जा करीत असतात. अनेक कामगारांना या ठिकाणी वाघाने दर्शन दिले. नांदाफाटा येथून कंपनीमध्ये प्रवेश केल्यानंतर गेट क्रमांक 2 जवळ सिमेंटची तोफ ठेवलेली आहे. या तोफेपासून वाघाने उडी मारली. आणि झुडुपामध्ये गेला. त्यावेळी तिथे उपस्थित असलेल्या कर्मचा:यांनी व सुरक्षारक्षकांनीसुद्धा वाघ बघितला. एका युवकाने तर वसाहतीत असलेल्या वाघाचा चक्क व्हिडीओच काढला. हा व्हिडीओ संपूर्ण परिसरात व्हायरल झाला असून वाघ असल्याचे निष्पन्नसुद्धा झाले आहे. याची माहिती सर्वप्रथम पोलिसांना आणि त्यानंतर वनविभागाला देण्यात आली.कंपनी प्रशासनानेही याचा धसका घेतला असून वसाहतीतील कामगारांना सतर्क राहण्यासाठी ठिकठिकाणी सूचना दिल्या जात आहे. लाऊड स्पीकरच्या माध्यमातून लोकांना या संदर्भात माहिती देण्यात येत आहे.या संदर्भात गडचांदूरचे ठाणोदार गोपाल भारती यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, घटनेची माहिती मिळाल्यानंतर याठिकाणी गस्त वाढवली आहे. वन विभागाच्या कर्मचा:यांना यासंबंधी माहिती देण्यात आली आहे. वन विभागाकडून वाघ असल्याची पुष्टी मिळाली आहे.अल्ट्राटेकमध्ये वाघ असल्याची पुष्टी झालेली आहे. नोकारी, पालगाव, बाखर्डीमार्गे वाघाने अल्ट्राटेकमध्ये प्रवेश केला आहे. परिसरातील दोन ते तीन गुरांना त्याने जखमी केले असून शुक्रवारीच अल्ट्राटेकमध्ये प्रवेश केला आहे. वनविभाग वाघाला पकडण्यात सतत प्रय}शील असून अल्ट्राटेकमध्ये तीन कॅमेरेसुद्धा लावण्यात आलेले आहे. नागरिकांनी वाघाला जेरबंद करेपयर्ंत सतर्क राहण्याची गरज आहे.- बी.सी. ब्रrाटेके,क्षेत्र सहायक, वनविभाग गडचांदूर