Tiger Attack: नवीन दुचाकीची पूजा करत असतानाच वाघाचा हल्ला, छिन्नविच्छिन्न अवस्थेत मिळाला शंकर यांचा मृतदेह 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2026 15:16 IST2026-04-25T15:12:44+5:302026-04-25T15:16:19+5:30

Chandrapur Tiger Attack: चंद्रपूरमध्ये एका व्यक्तीचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला. घरच्यांनी त्यांचा शोध घेतल्यानंतर स्मशानभूमीजवळ त्यांचा मृतदेह आढळून आला. 

Tiger Attack: Tiger attacks Shankar while worshipping new bike, body found in dismembered condition | Tiger Attack: नवीन दुचाकीची पूजा करत असतानाच वाघाचा हल्ला, छिन्नविच्छिन्न अवस्थेत मिळाला शंकर यांचा मृतदेह 

Tiger Attack: नवीन दुचाकीची पूजा करत असतानाच वाघाचा हल्ला, छिन्नविच्छिन्न अवस्थेत मिळाला शंकर यांचा मृतदेह 

चिमूर (चंद्रपूर) : नव्या दुचाकीची पूजा करण्यासाठी गेलेल्या ४८ वर्षीय इसमावर दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला चढवत त्याचा जीव घेतल्याची हृदयद्रावक घटना तालुक्यातील वाहनगाव शिवारात शुक्रवारी उघडकीस आली. शंकर दादाजी मसराम असे मृताचे नाव असून या घटनेने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मूळचे वाहनगाव येथील रहिवासी असलेले शंकर मसराम वरोरा तालुक्यातील खांबाडा येथे वास्तव्यास होते. गावातील देवकार्याकरिता ते वाहनगाव येथे आले होते. 

ओढ्यात बसलेल्या वाघाने केला हल्ला

नुकतीच खरेदी केलेल्या दुचाकीची पूजा करण्यासाठी ते गुरुवारी सकाळी शेतशिवारातील मोहाच्या झाडाजवळ गेले. पूजा सुरू असतानाच ओढ्यात दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर अचानक हल्ला चढवला.

आधी रुमाल आणि चष्मा दिसला, नंतर मिळाला मृतदेह

इकडे दिवसभर शंकर घरी न परतल्याने कुटुंबीयांनी त्यांची शोधाशोध सुरू केली. अखेर शुक्रवारी सायंकाळी ५ वाजता स्मशानभूमीजवळील नाल्यात त्यांचा चष्मा आणि दुपट्टा आढळला. 

काही अंतरावरच त्यांचा छिन्नविछिन्न अवस्थेतील मृतदेह मिळून आल्याने ग्रामस्थांना धक्का बसला. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुली असा परिवार आहे.

कुटुंबाला ५० हजारांची मदत

घटनेची माहिती मिळताच खडसंगी (बफर) येथील वनपरिक्षेत्र अधिकारी भारती राऊत व सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत मृतकाच्या वारस पत्नी संगीता मसराम यांना तातडीची ५० हजार रुपयांची मदत सुपूर्द केली. वनविभागाने शासनाच्या नियमांनुसार उर्वरित नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन दिले आहे.

Web Title : वाहन पूजा करते समय बाघ का हमला, व्यक्ति की मौत

Web Summary : वाहनगाँव में नई गाड़ी की पूजा करते समय एक 48 वर्षीय शंकर मसराम पर बाघ ने हमला कर दिया, जिससे उनकी मौत हो गई। बाघ एक नाले के पास छिपा हुआ था। उनका शव क्षत-विक्षत अवस्था में मिला, जिससे परिवार सदमे में है। वन विभाग ने तत्काल वित्तीय सहायता प्रदान की है।

Web Title : Tiger Attacks Man During Vehicle Blessing Ceremony, Kills Him

Web Summary : A 48-year-old man, Shankar Masram, was killed by a tiger in Vahangaon while performing a blessing ceremony for his new vehicle. The tiger, hiding near a stream, attacked him. His body was found dismembered, leaving his family in shock. The forest department has provided immediate financial assistance.