शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

चिचडोह प्रकल्पामुळे भेंडाळावासीय तहानलेले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2020 05:01 IST

भेंडाळा गावाची लोकसंख्या तीन हजार आहे. चामोर्शी-मूल मार्गावर असलेल्या या गावापासून पाच किमी अंतरावर बारमाही वाहणारी वैनगंगा नदी आहे. ३५ ते ४० वर्षांपूर्वी शेतात विहीर खोदून ५० हजार लीटर क्षमतेची पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आली.

ठळक मुद्देलॉकडाऊनच्या काळात पाणीटंचाई : नियोजनशून्यतेमुळे गावात समस्या

लोकमत न्यूज नेटवर्कभेंडाळा : चिचडोह बॅरेजसाठी वैनगंगा नदीचे पाणी अडविल्याने चामोर्शी तालुक्यातील भेंडाळा गावातील नळ पाणीपुरवठा योजना निकामी ठरली असून या गावात आठवड्यातून एक ते दोन दिवस पाणी पुरवठा होत आहे. ग्रामपंचायतीच्या नियोजनशून्यतेमुळे लॉकडाऊनच्या काळात नागरिकांना पाणीटंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे.भेंडाळा गावाची लोकसंख्या तीन हजार आहे. चामोर्शी-मूल मार्गावर असलेल्या या गावापासून पाच किमी अंतरावर बारमाही वाहणारी वैनगंगा नदी आहे. ३५ ते ४० वर्षांपूर्वी शेतात विहीर खोदून ५० हजार लीटर क्षमतेची पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आली. वाढती लोकसंख्या व पाण्याची गरज लक्षात घेऊन सात वर्षांपूर्वी वाघोली येथील वैनगंगा नदीवर वाढीव पाणीपुरवठा योजनेअंतर्गत ४० हजार लिटर क्षमतेची टाकी बांधण्यात आली. दोन्ही योजना मिळून एकूण ९० हजार लिटर क्षमतेची नळ योजना आहे. सद्यस्थितीत नवीन वाढीव पाणी योजना सुरू असून या योजनेतून अपुरा पाणीपुरवठा होत आहे. चिचडोह बॅरेजमध्ये पाणी अडविल्याने भेंडाळा येथील वैनगंगा नदीचा जलस्तर घटला आहे. त्यामुळे आठवड्यातून एक ते दोन दिवस गावातील नळाला पाणी येत आहे. अनियमित व अपुरा पाणीपुरवठा होत असल्याने गावातील महिला, पुरूष, लहान मुले, मुली सार्वजनिक विहीर व हातपंपावर पाण्यासाठी गर्दी करीत आहेत. अशा स्थितीत ग्रामपंचायत प्रशासनाने पर्यायी उपाययोजना करण्याची अपेक्षा गावातील नागरिकांनी व्यक्त केली आहे.एप्रिल महिन्यात गावात पाणीटंचाई निर्माण झाली असून वेळीच उपाययोजना केली नाही तर मे व जून महिन्यात मोठे पाणी संकट निर्माण होण्याची शक्यता आहे. कारण या दोन महिन्यात तापमान वाढत असतो. ग्रामपंचायत पदाधिकारी व प्रशासनाने यावर ठोस उपाययोजना करून पाणी समस्या मार्गी लावाव्या, अशी मागणी गावातील नागरिकांनी केली आहे.वाढीव पाणी योजनेच्या इन्टेक वेलमध्ये नदीपात्रातून कमी प्रमाणात पाणी येत आहे. टाकीतील अल्प पाणी संपूर्ण गावाला एकाचवेळी पुरत नाही. त्यामुळे तीन ते चार दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. जुन्या योजनेची मोटार नादुरूस्त असून तंटामुक्त समितीच्या निधीतून दुरूस्ती करण्याचा प्रस्ताव आहे. चिचडोह बॅरेजसाठी पाणी अडविल्याने इकडे परिणाम झाला आहे.- वनीता पोरेड्डीवार, सरपंच, ग्रा.पं.भेंडाळा

टॅग्स :water shortageपाणीकपात