उभ्या वाहनावर कार आदळल्याने नववधूसह तिघे जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:55 IST2020-12-04T04:55:35+5:302020-12-04T04:55:35+5:30

आपल्या घरी घेऊन येत असलेल्या नवविवाहिताच्या वाहनाने रेल्वे गेट बंदच्या दरम्यान उभ्या वाहनाला धडक दिली. या घटनेत ...

Three people, including the bride, were injured when a car collided with a vertical vehicle | उभ्या वाहनावर कार आदळल्याने नववधूसह तिघे जखमी

उभ्या वाहनावर कार आदळल्याने नववधूसह तिघे जखमी

आपल्या घरी घेऊन येत असलेल्या नवविवाहिताच्या वाहनाने रेल्वे गेट बंदच्या दरम्यान उभ्या वाहनाला धडक दिली. या घटनेत नवविवाहितेसह एक महिला व कार चालक जखमी झाले. ही घटना मंगळवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास घुग्घुस वणी रस्त्या वरील राजीव रतन चौकातील रेल्वे गेटजवळ घडली.

चंद्रपूर लालपेठ येथील काटकर कुटुंबियातील वर पक्षाकडील मंडळी यवतमाळ येथे दुर्गे कुटुंबियांनी आयोजित वधूच्या मंडपी विवाह सोहळा होता. विवाह आटोपल्यानंतर वधूला घेऊन चंद्रपूरकडे कारने परत येत असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने घुग्घुस-ताडाळी रेल्वे मार्गावरील उभ्या वाहनावर कार आदळली. या घटनेत नवविवाहिता प्राजक्ता, एक महिला व चालक जखमी झाले. जखमींना राजीव रतन केंद्रीय रुग्णालयात दाखल करून प्राथमिक उपचार करून सुटी देण्यात आली.

Web Title: Three people, including the bride, were injured when a car collided with a vertical vehicle