शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपुरात उभे आहेत ५५ अनधिकृत टॉवर्स !

By admin | Updated: July 9, 2014 23:22 IST

रिलायन्स जीओ या कंपनीला शहरात शंभर टॉवर उभारण्यासाठी दिलेल्या परवानगीवरुन वादंग माजले असतानाच मागील दोन वर्षांपासून शहरात तब्बल ५५ वेगवेगळ्या कंपन्यांचे मोबाईल टॉवर

चंद्रपूर : रिलायन्स जीओ या कंपनीला शहरात शंभर टॉवर उभारण्यासाठी दिलेल्या परवानगीवरुन वादंग माजले असतानाच मागील दोन वर्षांपासून शहरात तब्बल ५५ वेगवेगळ्या कंपन्यांचे मोबाईल टॉवर विनापरवानगीने उभे असल्याची बाब समोर आली आहे. यात मनपाचे तब्बल २७ लाख रुपपयांचे नुकसान झाले आहे. रिलायन्सवरुन वादळ निर्माण झाल्यानंतर आता मनपाने या टॉवरवर कारवाई करण्याची तयारी चालविली आहे. मागील महिन्याभरापासून महानगरपालिकेत रिलायन्स जीओ या कंपनीला टॉवर उभारण्यासाठी दिलेल्या परवानगीवरुन मनपा पदाधिकाऱ्यांना धारेवर धरले आहे. शहरात शंभर टॉवर उभारण्याच्या ठरावाला भाजप आणि काँग्रेसच्या नगरसेवकांनी विरोध केला आहे. रेडिएशन्समुळे मानवी आरोग्यावर याचा विपरीत परिणाम होईल, असे या नगरसेवकांचे म्हणणे आहे. दरम्यान, चंद्रपूर आरोग्य संघर्ष समिती, ज्येष्ठ नागरिक संघ आणि काँग्रेसने चंद्रपूर बंद करुन या टॉवर उभारणीला विरोध दर्शविला आहे. रिलायन्सला परवानगी देताना मोठा आर्थिक व्यवहार झाला, असेही आरोप होत आहे. टॉवरवरुन वादळ उठले असतानाच आता शहरात एकूण ८४ टॉवरपैकी ५५ टॉवर अनधिकृत असल्याची बाब समोर आली आहे. नगरपालिका असताना ते शहरात लावण्यात आले. तत्कालीन बांधकाम सभापतींनी या टॉवरविरोधात मोहिम हाती घेतली होती. मात्र, राजकीय दबावामुळे ही कारवाई थंडबस्त्यात गेली. त्यानंतर मनपाची निर्मिती झाली. तेव्हाही या टॉवरविषयी एकाही पदाधिकाऱ्याने वाच्यता केली नाही. सगळे शांत होते.विशेष असे की, टॉवर उभारताना नगरपालिका, मनपाचे ना-हरकत प्रमाणपत्र आवश्यक असते. उभारणी शुल्क म्हणून संबंधित कंपनीला २५ हजार रुपये स्थानिक स्वराज्य संस्थेत जमा करावे लागतात. मात्र, या ५५ टॉवरपैकी एकानेही शुल्क जमा केले नाही. परवानगी घेतली नाही. तेव्हा पालिकेचे जवळपास २७ लाख रुपयांचे नुकसान झाले. मनपा झाल्यानंतर आता हा दर प्रतिटॉवर एक लाख ३० हजार रुपये असा झाला. मनपाने कारवाई केली तर त्यांच्या उत्पन्नात ७१ लाख ५० हजार रुपयांची भर पडू शकते. मात्र, दोन वर्षांपर्यंत मनपाच्या पदाधिकाऱ्यांना हा प्रकार दिसला नाही. रिलायन्सच्या मुद्द्यावरुन आरोपांचा धुरळा उडाल्यानंतर त्यांना शहरातील अनधिकृत टॉवर दिसायला लागले आहेत. सोमवारी रिलायन्सने परवानगी न घेता श्रद्धानगर परिसरात टॉवर उभारण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्याला नगरसेवकांसह नागरिकांनी विरोध केला. मात्र दोन वर्षापासून मनपाच्या परवानगिशिवाय उभ्या असलेल्या टॉवरकडे कुणाचे लक्ष गेले नाही. यातही धक्कादायक बाब अशी, मनपातील एका पक्षाच्या पदाधिकाऱ्याच्या नातेवाईकाकडेही अनधिकृतरित्या टॉवर उभे केले आहे. दरम्यान, स्थायी समितीचे सभापती रामू तिवारी यांनी आयुक्त सुधीर शंभरकर यांना पत्र दिले आहे. या टॉवरवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. (शहर प्रतिनिधी)