शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दर ५३ मिनिटांनी एका चिमुकलीवर अत्याचार; नराधमांना कोण रोखणार?
2
Election Results 2026 LIVE: ५ राज्यांमध्ये 'सत्ता'धीश कोण?, आज होणार फैसला; पश्चिम बंगालकडे सगळ्यांचे लक्ष
3
आजचे राशीभविष्य, ०४ मे २०२६: मिथुन, वृश्चिक, मकर राशींना धनलाभाचे संकेत; कसा असेल तुमचा दिवस?
4
पाच राज्यांच्या भविष्याचा आज फैसला; प.बंगाल, तामिळनाडूच्या निकालावर नजरा
5
पाऊस चोरणारे देश? अमेरिका-इस्रायलवर 'ढगचोरी'चा खळबळजनक आरोप; प्रकरण काय?
6
राज्यात पहिलीपासून तिसऱ्या भाषेचा मुद्दा यंदाच्या वर्षी बारगळण्याची चिन्हे; डॉ. नरेंद्र जाधव समितीच्या अहवालावर निर्णय प्रलंबित
7
आधी नराधमाला फाशी द्या, मगच या...नसरापूरच्या पीडित पित्याचा संताप, न्यायाची केली मागणी; राजकीय नेत्यांच्या गर्दीने कुटुंब व्यथित
8
पाकिस्तान, चीन सीमेवर भारताची अहोरात्र ‘दृष्टी’; ‘गॅलेक्सआय’ या भारतीय स्टार्टअपचा उपग्रह लाँच
9
एसीच्या स्फोटाने आग; दिल्लीत ९ जणांचा मृत्यू; जळालेल्या आईच्या मिठीत होता मुलाचा मृतदेह
10
परीक्षा नव्हे, बोर्डच ‘नॉमिनल’ ! निकालात उच्चांक गाठणारे बोर्ड आता का मागे पडले?
11
मिसिंग लिंकवर सेल्फीसाठी थांबलात तर होईल मोठा ताप; वाहतूक पोलिसांकडून दाेन दिवसांत ९० वाहनांवर दंडात्मक कारवाई
12
या रक्तरंजित काळात कोहिनूरची आठवण का व्हावी?
13
कामगारांचा संताप आता रस्त्यावर उतरू लागला आहे, कारण..
14
सॉल्टलँड, परप्रांतीय आणि कॉन्स्टेबलचा मृत्यू..!
15
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
16
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
17
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
18
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
19
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
20
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
Daily Top 2Weekly Top 5

दहा पंचायत समित्यांना ११ कोटींचा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2017 00:25 IST

जिल्हा परिषद अंतर्गत जिल्हा हागणदारीमुक्त करण्याचे कसोशीने प्रयत्न आहेत. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत जिल्ह्यातील

हागणदारी मुक्तीकडे वाटचाल : प्रत्येकांनी शौचालय बांधण्याचे आवाहनलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्हा परिषद अंतर्गत जिल्हा हागणदारीमुक्त करण्याचे कसोशीने प्रयत्न आहेत. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक पंचायत समितीपासून तर गावस्तरावरील यत्रंणा या कामास लागली आहे. गावस्तरावर शौचालय बांधकामाची कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी जिल्हा परिषदेकडून नुकताच दहा पंचायत समित्यांना ११ कोटी ४ लाखांचा निधी वितरीत करण्यात आला आहे.स्वच्छ भारत मिशन अंतर्गत जिल्ह्यात स्वच्छतेची चळवळ निर्माण झाली असून जिल्हा हागणदारी मुक्त करण्याच्या कामाला वेग आला आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील नऊ तालुके हागणदारीमुक्त म्हणुन घोषीत करण्यात आले असून सहा तालुके हागणदारीमुक्त होण्याच्या मार्गावर आहेत. वैयक्तीक शौचालयाचे बांधकाम करुन नियमित वापर केल्यास गावातील घाणीचे साम्राज्य नाहीसे होण्यास मदत होणार आहे. यामुळे गावातील वातावरण आरोग्यदायी होऊन, लोकांचा जिवनमान उंचावण्यास मदत होईल. जिल्हा हागणदारी मुक्त करण्याचे आवाहन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले असून यासाठी गावातील प्रत्येकांनी जिल्हा हागणदारीमुक्त करण्याच्या चळवळी मध्ये सहभागी झाल्यास लवकरच जिल्हा हागणदारी मुक्ती होईल. यासाठी जिल्हा परिषद दक्ष आहे. त्यानुसार आॅक्टोबर २०१७ अखेर जिल्हा हागणदारी मुक्त करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. जिल्हा परिषदचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक सिरसे यांनी नुकतीच स्वच्छ भारत मिशन अंतर्गत वैयक्तीक शौचालयाच्या प्रोत्साहन निधी वितरणास ११ कोटी ४ लक्ष रूपयांची मान्यता दिली. त्यानुसार पंचायत समित्यांना निधी वितरित करण्यात आला आहे. त्यामुळे आता प्रत्येक लाभार्थ्यांना वेळेवर अनुदान मिळणार आहे.