शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
3
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
4
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
5
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
6
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
7
विशेष लेख: नॉनस्टॉप ७० तास गेमिंग! खाणं, झोपणं तिथेच!
8
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
9
लेख: काँक्रीटच्या जंगलात चतकोर तरी मोकळी जागा ठेवाल का?
10
लेख: डोनाल्ड ट्रम्प यांना झुकवणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीचे रहस्य!
11
आजचा अग्रलेख: शस्त्रे म्यान, गळचेपी सुरूच !
12
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
13
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
14
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
15
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
16
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
17
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
18
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
19
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
20
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
Daily Top 2Weekly Top 5

श्रावण मासातही भाविकांसाठी मंदिर बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2020 05:00 IST

श्रावण महिन्यातील सोमवारला बेलपत्र व धान्याची शिवमुठ वाहण्याची परंपरा आहे. पहिला श्रावण सोमवार २७ ला येणार असून तांदळाची शिवमुठ आहे. तर दुसऱ्या सोमवार तीन ऑगस्टला आहे. या दिवसी तिळाची शिवमुठ असून नारळी पोर्णिमा अर्थात रक्षाबंधनही आहे. तिसरा सोमवार १० ऑगस्टला असून मुगाची शिवमुठ आहे. ११ ऑगस्टला श्रीकृष्ण जन्माष्टमी आहे. चौथा श्रावण सोमवार १७ ला असून जवसाची शिवमुठ आहे.

ठळक मुद्देकोरोना इफेक्ट : चंद्रपूरच्या अंचलेश्वर मंदिरासह शहरातील सर्व मंदिर लॉकडाऊन

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर: श्रावण महिना धार्मिकदृष्ट्या पवित्र समजला जातो. संपूर्ण महिन्यातील प्रत्येक सोमवारला श्रावणी सोमवार म्हणून उपवास केला जातो. महादेवाच्या मंदिरातील शिवलिंगावर बेलपाने आणि शिवमुठ वाहण्याची परंपरा आहे. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वच मंदिर बंद असल्याने शिवभक्तांना यावर्षी घरीच राहून पूर्जाअर्चना करावी लागत आहे.श्रावण महिना २१ जुलैला सुरु झाला आणि १९ ऑगस्टला संपणार आहे. याच महिन्यात रक्षाबंधन, पोळा , श्रीकृष्ण जन्माष्टमी आदी सण आहेत. मात्र, यावर्षी सर्वच सण, उत्सव साधेपणाने साजरे करून सहकार्य करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.दरम्यान, रक्षाबंधनाच्याही सणाला भाऊ-बहीणही एकमेकांपर्यंत कोरोनामुळे पोहोचू शकणार नसल्याने बहिणीने पोष्टाने पाठविलेली राखी भावाला हातावर बांधावी लागणार आहे. बहिणभावाच्या या सणावरही यावर्षी विरजण पडले आहे.श्रावण महिन्यातील सोमवारला बेलपत्र व धान्याची शिवमुठ वाहण्याची परंपरा आहे. पहिला श्रावण सोमवार २७ ला येणार असून तांदळाची शिवमुठ आहे. तर दुसऱ्या सोमवार तीन ऑगस्टला आहे. या दिवसी तिळाची शिवमुठ असून नारळी पोर्णिमा अर्थात रक्षाबंधनही आहे. तिसरा सोमवार १० ऑगस्टला असून मुगाची शिवमुठ आहे. ११ ऑगस्टला श्रीकृष्ण जन्माष्टमी आहे. चौथा श्रावण सोमवार १७ ला असून जवसाची शिवमुठ आहे. १८ ला पोळा तर १९ ऑगस्टला श्रावण मासाची समाप्ती आहे. श्रावण महिन्यातील प्रत्येक श्रावण सोमवारला दरवर्षी शिवमंदिरात भाविकांच्या रांगा लागतात. यावर्षी कोरोनामुळे सर्वांनी मंदिरात न जाता घरीच पूजा अर्चा करावी लागणार आहे.श्रावणमासाचे सर्व महिन्यात सर्वश्रेष्ट स्थान असून निसर्गही या कालावधीत हिरवा शालू पांघरत असल्याने सर्वत्र आनंद असतो. मात्र यावेळी कोरोनाच्या संकटामुळे सर्वांचा आंनद हिरावला आहे.

टॅग्स :Templeमंदिर