जिल्हा परिषदेसमोर शिक्षकांचा आक्रोश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2020 06:00 AM2020-01-20T06:00:00+5:302020-01-20T06:00:26+5:30

जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित समस्यांना घेऊन जिल्हा परिषदेसमोर महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेतर्फे धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला आमदार किशोर जोरगेवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस राजेंद्र वैद्य, माजी विधान परिषद सदस्य बाळासाहेब साळुंखे यांनी भेट देऊन शिक्षकांच्या प्रलंबित समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.

Teachers' outrage before the Zilla Parishad | जिल्हा परिषदेसमोर शिक्षकांचा आक्रोश

जिल्हा परिषदेसमोर शिक्षकांचा आक्रोश

Next
ठळक मुद्देपुरोगामी शिक्षक संघटना : प्रलंबित समस्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर: जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित समस्यांना घेऊन जिल्हा परिषदेसमोर महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेतर्फे धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला आमदार किशोर जोरगेवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस राजेंद्र वैद्य, माजी विधान परिषद सदस्य बाळासाहेब साळुंखे यांनी भेट देऊन शिक्षकांच्या प्रलंबित समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. उपशिक्षणाधिकारी मोहन पवार यांनी निवेदन स्वीकरले.
आदिवासी भागात कार्यरत शिक्षकांना एकस्तर वेतनश्रेणी लागू करावी, २०१७ नंतर पात्र झालेल्या प्राथमिक शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणी लागू करावी, पदवीधर शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणी, प्राथमिक शिक्षक व पदवीधर शिक्षकांना निवडश्रेणी लागू करावी, ६ ते ७ वे वेतन आयोगाच्या सेवापुस्तक पडताळणी करावी न केल्यास पुढे कोणतीही वसुली करु नये, वैद्यकीय प्रतिपूर्ती व जीपीएफ कर्ज मंजुरीसाठी कालमर्यादा निश्चित करावी, टोकन पद्धती लागू करावी, २०१४ च्या बीएससी पदवीधर नियुक्त शिक्षकांना वेतनश्रेणी लागू करावी, डीसीपीएस कपातीच्या पूर्ण हिशोबासह पावत्या द्याव्या, प्राथमिक शिक्षकांच्या मागे लागलेली व त्यांचे अध्यापनाचे दिवस कमी करणारी प्रशिक्षणे बंद करावी, विस्तार अधिकारी व मुख्याध्यापक पदोन्नती प्रक्रिया तत्काळ राबवावी, तालुका व जिल्हास्तर शिक्षक समायोजन करावी यासह अन्य मागण्यांन घेऊन सदर आंदोलन करण्यात आले. विजय भोगेकर, हरीश ससनकर, अलका ठाकरे, नारायण कांबळे, रवी सोयाम, निखिल तांबोळी यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. मोठ्या संख्येने शिक्षकांनी सहभाग घेतला.

Web Title: Teachers' outrage before the Zilla Parishad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.