शहरं
Join us  
Trending Stories
1
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
2
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
3
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
4
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
5
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
6
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
7
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
8
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
9
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
10
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
11
Latest Marathi News LIVE Updates: आमच्यासाठी निवडणूक नाही तर दादांच्या स्मृतींचा यज्ञ - देवेंद्र फडणवीस
12
सामान्य फोनपेक्षा वेगळा! सॅटेलाइट फोन म्हणजे नक्की काय? भारतात बाळगल्यास होऊ शकते थेट जेल
13
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
14
IAS Kinjal Singh : संघर्षातून गाठलं यशाचं शिखर; लहानपणी वडिलांची हत्या, आईचा कॅन्सरने मृत्यू, जिद्दीने झाली IAS
15
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
16
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
17
१० हजार+ धावा, १७५ विकेट्स, पण आयपीएलमध्ये ५ वर्षे बेंचवर बसून राहिला 'हा' अष्टपैलू खेळाडू
18
Narasimha Navratri 2026: नृसिंह नवरात्र विशेष: नऊ दिवस नऊ उपासना; संकटमुक्तीसाठी करा ही विशेष साधना!
19
भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
20
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
Daily Top 2Weekly Top 5

अवैध उत्खनन करणाऱ्यांवर तत्काळ कारवाई करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:35 IST

गोंडपिपरी : तालुक्यातील बहुतांश रेती घाटावर गेल्या काही महिन्यांपासून रेती माफियांनी दिवस-रात्र उत्खननाचा सपाटा चालविला असून, यामुळे शासनाचे कोट्यवधी ...

गोंडपिपरी : तालुक्यातील बहुतांश रेती घाटावर गेल्या काही महिन्यांपासून रेती माफियांनी दिवस-रात्र उत्खननाचा सपाटा चालविला असून, यामुळे शासनाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत आहे. या गंभीर प्रकाराकडे स्थानिक महसूल अधिकाऱ्यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असून, महसूल विभागाच्या आधिकाऱ्यांच्या साटेलोटे धोरणामुळे हा सर्व प्रकार चालू असल्याचा आरोप शेतकरी संघटनेने केला असून, या सर्व प्रकाराची चौकशी व दोषींवर कठोर कारवाई करण्यासाठी गोंडपिपरी तहसिलदारामार्फत महसूलमंत्र्यांना निवेदन देण्यात आले.

गोंडपिपरी तालुक्यात बारमाही वाहणाऱ्या वैनगंगा, अंधारी, वर्धा या नदी पात्रात, तसेच जवळच्या परिसरातील धाबा हिवरा आणि इतर नाल्यांमध्ये प्रचंड प्रमाणात रेतीसाठा दरवर्षी उपलब्ध होतो. गेल्या वर्षीपासून पर्यावरण विभागाच्या अडसर धोरणामुळे रेती घाटांचे लिलाव झाले नाही. अशा स्थितीत वाळूमाफियांनी स्थानिक महसूल अधिकाऱ्यांची साटेलोटे करून, तालुक्यातील फुर्डीहेटी, लिखित वाडा, येनबोथला,हिवरा, कुलथा, धाबा, आदी रेती घाटावरून चक्क पोकलॅण्ड यंत्राच्या साहाय्याने अवैध उत्खननाचा सपाटा गेल्या काही महिन्यांपासून सुरू केला आहे. यात तालुक्यातील ट्रॅक्टर चालक मालक यांचा ही समावेश असून, रात्रपाळी रेती घाटातून रेती उपसणे, त्यानंतर साठवणूक केलेली रेती मोठ्या हायवा गाड्यांच्या माध्यमातून शहरी भागात विक्री करणे, असा अत्यंत गंभीर प्रकार सुरू आहे. तत्पूर्वी याच गोरख धंद्याला अधिकृत स्वरूप देण्यासाठी रात्रपाळी अगोदर रेतीचा उपसा करून साठा तयार करणे व त्यानंतर महसूल विभागाकडून त्याची जप्ती दाखवून मनमर्जीतील वाळू माफियांना वाहतुकीच्या परवाना देणे ही नवी शक्कल लढविली जात आहे. शासनाच्या वाळू घाट लिलाव बंदीला तिलांजली देत रेती माफिया व महसूल अधिकारी यांनी आगळी वेगळी शक्कल लढवून शासनाला कोट्यवधींचा चुना लावण्याचा प्रकार गोंडपिपरी तालुक्यात सर्रास सुरू आहे. येत्या सात दिवसांच्या आत तालुक्यात सुरू असलेल्या अवैद्य वाळू उत्खनन प्रकाराची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष तुकेश वानोडे यांनी निवेदनातून दिला आहे. निवेदन सादर करताना प्रामुख्याने शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष तुकेश वानोडे, स्वतंत्र भारत पक्ष तालुकाध्यक्ष व्यंकटेश मल्लेलवार, शेतकरी संघटना तालुका अध्यक्ष ॲड. प्रफुल्ल आस्वले, शिवसेना उपतालुका प्रमुख हरमेलसिंग डांगी, सुरेश भसारकर, रामदास मोहुर्ले, गंगाधर तेलकापल्लीवार उपस्थित होते.