शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

बेकायदेशीर मान्यता देणाऱ्या शिक्षणाधिकाऱ्यांवर कारवाई करा

By admin | Updated: March 12, 2016 01:23 IST

शिक्षकांच्या पदभरतीस बेकायदा मान्यता देणाऱ्या शिक्षणाधिकाऱ्यांवर कारवाई करा.

मागणी : विमाशि संघाचे निवेदनचंद्रपूर : शिक्षकांच्या पदभरतीस बेकायदा मान्यता देणाऱ्या शिक्षणाधिकाऱ्यांवर कारवाई करा. वैयक्तीक मान्यता मिळालेल्या शिक्षकांना कामावरून कमी करू नका, अशी मागणी वि.मा.शि. संघाचे माजी आमदार व्ही.यू. डायगव्हाणे यांनी केली आहे.खाजगी व्यवस्थापन तसेच स्थानिक स्वराज्य संस्थाअंतर्गत प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळामधील नियुक्ती, पदभरतीवरील बंदी उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद यांनी दिलेल्या आदेशानुसार अंशत: पद भरण्यास ६ सप्टेंबरच्या आदेशाने दिलेली परवानगी ६ नोव्हेंबर २०१५ व १४ जानेवारीचे आदेशाने रद्द केली.६ मार्चच्या आदेशाने पुन:बंदी उठविण्यात आली. पदभरतीबाबत २० जून २०१४ व २० आॅगस्ट २०१४ च्या शासन निर्णयाप्रमाणे पदभरतीबाबत २० जून, १९ जुलै व २० आॅगस्ट २०१४ च्या शासन निर्णयाप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी, असे ९ फेब्रुवारीच्या शासन निर्णयान्वये आदेशित करण्यात आले आहे.बंदी उठविली असे शिक्षणमंत्री व काही आमदार प्रतिनिधींनी व्यक्तव्य केले असले तरी ज्या उक्त तीन शासन निर्णयाप्रमाणे कार्यवाही करावयाची आहे, हे लक्षात घेता पदभरती करणे शक्य नाही. याबाबत सुस्पष्ट व सर्व शासननिर्णय अधिग्रहीत करून एकच शासन निर्णय काढावा, अशी मागणी व्ही.यू. डायगव्हाणे यांनी शिक्षण व शिक्षणसंचालक पुणे यांच्याकडे निवेदनाद्वारे केलेली आहे.विदर्भातील ११ जिल्ह्यांपैकी बहुतांश जिल्ह्यात २०१४-१५ शाळांना स्टॉकिंग मिळाले नाही. सन २०१३-१४ च्या अतिरिक्त शिक्षक कर्मचाऱ्यांचे अद्याप समायोजन झाले नाही. मागील तीन वर्षात नियुक्त झालेल्या शेकडो शिक्षक सेवकांना सेवेतून पदमुक्त केले. त्यांचा संसार उघड्यावर पडला, याकडेही त्यांनी लक्ष वेधले आहे. (शहर प्रतिनिधी)