शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

बोगस लाभार्थ्यांना अनुदानाचा लाभ

By admin | Updated: March 13, 2016 01:09 IST

स्वछ भारत मिशन अंतर्गत २०१४-१५ मध्ये नांदा ग्रामपंचायतीच्या वतीने वैयक्तिक शौचालय बांधकामासाठी १३२ लाभार्थ्यांना १२ हजार रुपयांचे वाटप करण्यात आले.

नांदा ग्रामपंचायतीचा प्रकार : माहिती अधिकारातून बाब उघडकीसगडचांदूर : स्वछ भारत मिशन अंतर्गत २०१४-१५ मध्ये नांदा ग्रामपंचायतीच्या वतीने वैयक्तिक शौचालय बांधकामासाठी १३२ लाभार्थ्यांना १२ हजार रुपयांचे वाटप करण्यात आले. मात्र सदर लाभार्थ्यांमध्ये अनेक बोगस लाभार्थी असल्याचे आरटीआय कार्यकर्ते राजु काळे यांनी माहिती अधिकारातून मागितलेल्या माहितीतून समोर आले.मिळालेल्या माहितीनुसार ज्या लाभार्थ्यांनी ३-४ वर्षांपूर्वीच शौचालय बांधलेले आहे किंवा ज्यांना दारिद्र रेषेअंतर्गत घरकुल योजनेचा लाभ मिळाला आहे, अशा लोकांना ग्रामपंचायतीने लाभ दिला आहे. तर काही लोकांनी शौचालयाची दुरुस्ती करून लाभ घेतलेला आहे. एका व्यक्तीच्या तर तब्बल आडनावात बदल करून दोनदा लाभ दिल्याचे दिसून येते. यादीतील अनुक्रमांक २६ वर भगवान बापूराव दखरेश यांना लाभ दिला आहे तर १३० वर भगवान डाखरे यांना लाभ दिला आहे. पहिल्या नावातील आडनावात फेरबदल करून लाभ दिल्याचे यादीवरून निदर्शनास आले. हे दोन्ही व्यक्ती एकच आहे.अनुक्रमांक ६१ वर सुमन इदे या महिलेला लाभ दिला आहे. या महिलेला दोन घरे आहेत. जुन्या राहत्या घरी शौचालय असताना नवीन घरासाठी शौचालय अनुदान दिले आहे. अनुक्रमांक १२१ वर लक्ष्मीबाई बत्तीनवार ही महिला आवारपूर येथे कायम वास्तव्यास असून त्यांचे स्वताचे घर आहेत. त्यामध्ये जुने शौचालय आहे. तरीसुद्धा नंदाफाटा येथील घराकरिता शौचालयाचे अनुदान दिले आहे. अनुक्रमांक १५, ६३, व १२४ या नागरिकांनी शासनाकडून बी.पी.एल. घरकुलाचा लाभ घेतला आहे. तरीसुद्धा त्यांना नांदा ग्रामपंचायतीने लाभ मिळवून दिल्याने आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे. पात्रता सर्वेमध्ये नाव नसताना अनेक लाभार्थ्यांना शौचालयाचे अनुदान दिल्याचे निदर्शनास येते. सदर अनुदान देत असताना ग्रामपंचायतीची मंजुरी घ्यायला पाहिजे होती. मात्र तसे झाले नाही. तसेच पाचशे रुपयांवरील कितीही रक्कम देत असताना ती रेखांकित धनादेशाद्वारेच द्यावी लागते. परंतु ग्राम विस्तार अधिकारी सुरेश वाढई व सरपंच पूजा मडावी यांनी बेरर धनादेशाद्वारे रक्कम दिलेली आहे. (शहर प्रतिनिधी)