शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबत संशोधनवृत्ती बाळगणे आवश्यक

By admin | Updated: November 2, 2015 00:58 IST

आज शिक्षणामध्ये प्रचंड स्पर्धा असून या स्पर्धेत आपला टिकाव लागणे आवश्यक आहे. यासाठी संशोधन महत्त्वाचे आहे...

मधुकर नक्षिणे : नगाजी महाराज पुण्यतिथी उत्सवचंद्रपूर : आज शिक्षणामध्ये प्रचंड स्पर्धा असून या स्पर्धेत आपला टिकाव लागणे आवश्यक आहे. यासाठी संशोधन महत्त्वाचे आहे. विद्यार्थ्यांनी यावर लक्ष केंद्रीत केल्यास संशोधनाच्या बळावर माणूस कोणत्याही क्षेत्रात यश मिळवू शकतो, असे प्रतिपादन प्रा.डॉ.मधुकर नक्षिणे यांनी केले. ते संत नगाजी महाराज पुण्यतिथी उत्सवात शुक्रवारी गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती व बक्षीस वितरण कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोविंदराव किनगावर तर प्रमुख पाहुणे म्हणून सहाय्यक लेखा परीक्षक अधिकारी विजय लाखे, मंदा किन्हीकर व वन व सामाजिक वनिकरण कार्यालयीन कर्मचारी संघटनेचे उपाध्यक्ष विनोद वाटेकर, गुणवंत वाटेकर उपस्थित होते.यावेळी नाभिक समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात विद्यार्थ्यांना पदक, स्मृतिचिन्ह व रोख रक्कम देवून गौरविण्यात आले. दिवाकर किन्हीकर स्मृती पारितोषिक अणेव भाऊराव नक्षिणे, शुभम देवीदास किनगावकर, पायल मोहन वनकर यांना देण्यात आले. रामदास वाटेकर व ताराबाई वाटेकर स्मृती पारितोषिक सरस्वती प्रशांत, निकिता देवराव वाटेकर, शीतल नरेश वाटेकर, तृशाली दत्तुजी कडूकर, काजल मोहन वनकर, प्रणय चंद्रकांत घुमे, सारीका गुलाबराव नक्षिणे, रोशन प्रदीप पांडे यांना देण्यात आले.हा कार्यक्रम स्थानिक गोपालकृष्ण व श्री संत नगाजी महाराज देवस्थानात पार पडला. कार्यक्रमात संचालन बाबाराव कडूकर यांनी तर आभार डॉ.लक्ष्मीकांत कडूकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्यामदेव उरकुडे, रत्नाकर वानकर, शंकरराव जुनारकर, श्याम राजुरकर, दीपक नक्षिणे, विलास बडवाईक, प्रकाश चांदेकर यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला नाभिक समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)