शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

गावकऱ्यांच्या वादात अडकली माथरा पाणीपुरवठा योजना

By admin | Updated: May 8, 2015 01:10 IST

शासन ग्रामीण भागाच्या विकासासाठी अनेक योजना राबविते. शासकीय योजना निट राबविली तर गावाच्या विकासात योजना सार्थकी लागते.

गोवरी : शासन ग्रामीण भागाच्या विकासासाठी अनेक योजना राबविते. शासकीय योजना निट राबविली तर गावाच्या विकासात योजना सार्थकी लागते. मात्र गावकऱ्यांनी केलेल्या मोटरपंप स्विचरूमच्या वादात गावकऱ्यांनाच पाणीपुरवठा नळ योजनेच्या पाण्यापासून वंचित राहण्याची वेळ माथरावासीयांवर आल्याने नागरिकांना दारोदार पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.राजुरा तालुक्यातील माथरा हे राजुरा-कवठाळा मुख्य मार्गावरील ६७० लोकसंख्या असलेले गाव. या गावात दोन-तीन वर्षापूर्वी राष्ट्रीय पेयजल योजनेतून पाण्याची टाकी मंजूर होऊन बांधकामाला सुरूवात झाली. ग्रामपंचायतीने यासाठी भूमिगत पाईपलाईन गावात टाकली. पाणी पुरवठा नळयोजनेचे पाणी नागरिकांच्या घरापर्यंत पोहोचणार असल्याने महिलांची पाण्यासाठी होत असलेली भटकंती थांबणार, याचा आनंद गावकऱ्यांना होता. पाण्याच्या टाकीचे बांधकाम सुरू झाल्यामुळे नागरिकांना लवकरच नळयोजनेचे पाणी मिळेल, अशी आस होती.मात्र पाणी पुरवठा नळयोजनेच्या मोटारपंपाचे स्विचरूम नेमके कोणत्या ठिकाणी बांधावे, यासाठी गावकऱ्यांत वाद झाला. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेच्या आवारात स्विचरूम बांधकाम करण्यासाठी जागा निश्चित करून बांधकामाला सुरूवात झाली. मात्र गावातील काही लोकांनी याला विरोध करीत मंदीर आणि शाळेच्या आवारात बांधकाम होऊ द्यायचे नाही, असा पवित्रा घेतला. याच वादाच्या ठिणगीला राजकीय स्पर्श झाल्याने गावकऱ्यांनी मोटरपंप स्विचरूमसह पाण्याच्या टाकीचे सुरू असलेले बांधकाम बंद पाडले.गावकऱ्यांच्या हातातोंडाजवळ आलेले पाणी गावकऱ्यांनी गावकऱ्यांच्या वादात दूर पळवून नेल्यामुळे चांगली योजना असूनही गावकऱ्यांना त्याचा लाभ घेता आला नाही. हे माथरावासीयांचे दुदैव आहे. माथरा गावाला स्वतंत्र ग्रामपंचायत नाही. त्यामुळे या गावाचा कारभार खामोना ग्रामपंचायतीतून चालतो. खामोना गावाला सरपंच तर माथरा गावाला उपसरपंच मिळाला. गाव पातळीवर मिनीमंत्रालय समजल्या जाणाऱ्या ग्रामपंचायत प्रशासनाचे दोन लोकप्रतिनिधी दोन गावाला मिळाले. मात्र विकासनिधी खेचून आणण्यात ते अपयशी ठरल्यामुळे गावाच्या विकासकामांना खीळ बसली आहे.माथरा गावात सदर प्रतिनिधीने फेरफटका मारला असता गावात मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. शेणखतांचे ढिगारे रस्त्यावर असल्याने पावसाळ्यात रस्त्यावर घाण साचते. त्यामुळे गावात विकासकामांचा खेळखंडोबा झाला आहे. (वार्ताहर)