शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प चिडले, पण फेमस झाल्या जॉर्जिया मेलोनी! तरुणाई तर त्यांच्यामागे खंबीरपणे उभी राहिली
2
मुंबईत ‘ऑपरेशन व्हाइट स्ट्राइक’, १,७४५ कोटींचे अमली पदार्थ जप्त; ३४९ किलो कोकेनही हस्तगत
3
आजचे राशीभविष्य - २ मे २०२६, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील, कुटुंबात सुख-शांती नांदेल
4
IPL 2026: वैभव-यशस्वीची धडाकेबाज जोडी फ्लॉप! तरी RR निर्धास्त; KL राहुलच्या खेळीने DC ला मोठा दिलासा
5
पुणे-मुंबई प्रवासाच्या स्वप्नाचा एक टप्पा पूर्ण, लवकरच नामकरण; अर्थव्यवस्थेला ७०००० कोटींची गती
6
महामुंबईत सायकल ट्रॅकचा ‘ट्रॅक’च हरवला!, सायकल आहे, पण चालवायची कुठे?; कोट्यवधींचा खर्च वाया
7
पेट्रोल-डिझेल दरवाढ उंबरठ्यावर?; व्यावसायिक गॅस सिलिंडरही महागले, निवडणुका आटोपताच तगडा झटका
8
कुजबुज! ठाण्यात पाऊल ठेवू देणार नाही म्हणणारे शिंदेसेनेचे पदाधिकारी राऊतांच्या स्वागताला पोहचले
9
पहिल्याच दिवशी मिसिंग लिंकवर ज्वलनशील पदार्थांची सर्रास वाहतूक; बंदी केवळ कागदावरच
10
‘परदेशांत भ्रमण न केल्यास नागदेवता दंश करेल’; फिर्यादीच्या पैशांवर भोंदू खरात करायचा मौज
11
मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पासाठी सात देशांच्या तंत्रज्ञानाचा वापर; प्रमुख फायदे कोणते?
12
अजबच! बीकेसीत सायकल ट्रॅक बांधण्यासाठी ६० कोटी अन् आता काढण्यासाठी २५ कोटी खर्च केला
13
घरांच्या किमती कमी करण्याची म्हाडावर नामुष्की; विक्रोळीतील १,२२१ घरांच्या किमती ७.५ टक्क्यांनी कमी
14
‘MMC’ निवडणूक झाली, कौन्सिलमध्ये कोण असणार?; नामनिर्देशित की निवडून आलेले?, डॉक्टरांमध्ये संभ्रम
15
मध्य रेल्वेवर उद्या ‘नीट’मुळे ब्लॉक नाही; आज विशेष ब्लॉक, शेवटची लोकल सव्वाअकराची
16
आठ वर्षांच्या मुलीचे जबरदस्तीने चुंबन, आरोपीस ५ वर्ष सक्त मजुरीची शिक्षा, कोर्टानं ठरवलं दोषी
17
...तर अन्नपदार्थांचा उल्लेख धर्माचा अपमान ठरत नाही; शेखर सुमन, भारती सिंह यांना हायकोर्टाचा दिलासा
18
रोहित शेट्टी गोळीबारप्रकरणी १५ आरोपींवर आरोपपत्र दाखल; २ मुख्य आरोपी अद्यापही फरार
19
सहलीत सेल्फीचा मोह जिवावर बेतला, मावळच्या धरणात तीन मित्र बुडाले; एकाला वाचविण्यात यश
20
...तेव्हाच मुंबई, गोवा ड्रग्जमुक्त होऊ शकेल; इथे दबा धरून बसलेत हजारो सलीम डोला
Daily Top 2Weekly Top 5

वादळी पावसाचा जिल्ह्यातील अनेकांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2020 05:00 IST

चंद्रपुरात रात्री ९ वाजता वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. सुमारे १५ मिनिटे झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणची झाडे उन्मळून पडली. वीज ताराही तुटल्या. त्यामुळे रात्री दीड वाजेपर्यंत वीज पुरवठा खंडित होता. घुग्घुससह नकोडा येथील झाडे कोसळली. त्यामुळे ठिकठिकाणी वीज प्रवाहित तारा तुटल्या. काही ठिकाणी वीज खांबही वाकले. त्यामुळे घुग्घुस येथील वीज पुरवठाही खंडित होता.

ठळक मुद्देझाडे कोसळली, टिनाही उडाल्या : अनेक गावांचा वीज पुरवठा खंडित

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : सोमवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास चंद्रपूरसह जिल्ह्यात वादळी पाऊस झाला. या पावसामुळे अनेक मार्गावरील झाडे कोसळली. काही घरांच्या टिना उडाल्या. रबी पिकांचेही मोठे नुकसान झाले.चंद्रपुरात रात्री ९ वाजता वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. सुमारे १५ मिनिटे झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणची झाडे उन्मळून पडली. वीज ताराही तुटल्या. त्यामुळे रात्री दीड वाजेपर्यंत वीज पुरवठा खंडित होता. घुग्घुससह नकोडा येथील झाडे कोसळली. त्यामुळे ठिकठिकाणी वीज प्रवाहित तारा तुटल्या. काही ठिकाणी वीज खांबही वाकले. त्यामुळे घुग्घुस येथील वीज पुरवठाही खंडित होता.नागभीड तालुक्यात मोठया प्रमाणात गहु, चना पिकांचे उत्पादन घेतले जाते. सोमवारी रात्री आलेल्या अवकाळी पावसामुळे अनेकांच्या शेतातील गहु व चना पिंकाचे अतोनात नुकसान झाले आहे. एकीकडे कोरोना विषाणूची दहशत तर दुसरीकडे अवकाळी पावसाचा फटका, यामुळे शेतकरी, शेतमजुरांना मोठया संकटातून जावे लागत आहे.भिसी व परिसरात रविवार व सोमवारी मध्यरात्री वादळी वाºयासह जोरदार पाऊस पडला. त्यामुळे शेतकऱ्यांनी कापून ठेवलेले चना व गव्हाचे पीक ओले झाले व बरेच नुकसान झाले. वातावरणातील बदलामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होऊन सर्दी, खोकल्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये कोरोनाची भीती उदभवू लागली आहे. अशावेळी नागरिकांनी स्वत:च्या प्रकृतीकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. 

टॅग्स :Rainपाऊस