शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

भद्रावतीत भाकपाचे रास्ता रोको

By admin | Updated: May 14, 2015 01:38 IST

भाजपा प्रणित केंद्र शासनाच्या वतीने शेतकऱ्याला मारक तर भांडवलदारांना तारक असा भूमी अधिग्रहणाचा कायदा तयार करण्याचा घाट घातला आहे.

भद्रावती : भाजपा प्रणित केंद्र शासनाच्या वतीने शेतकऱ्याला मारक तर भांडवलदारांना तारक असा भूमी अधिग्रहणाचा कायदा तयार करण्याचा घाट घातला आहे. या कायद्याच्या विरोधात येथील भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्यावतीने रास्ता रोको आंदोलन करून विरोध दर्शविला. बुधवारी दुपारी १२ वाजता नागपूर-चंद्रपूर महामार्गावर पेट्रोल पंप चौकात भाकपाचे जिल्हा सहसचिव राजू गैणवार यांच्या नेतृत्वात रास्ता रोको करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी तयार करीत असलेल्या भूमी अधिग्रहण कायदा हा शेतकऱ्यांच्या मालकीची जमीन हिरावून घेणारा तर भांडवलदारांना जमिनी मिळवून देवून त्यांना खरबोपती बनविणारा कायदा आहे. भारत देश हा शेतीप्रधान असल्याने शेतीवर उपजिवीका करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. याकडे दुर्लक्ष करून मोजक्या भांडवलाच्या फायद्यासाठी हा कायदा तयार करण्यात येत आहे. या कायद्याला भाकपातर्फे रस्ता रोकोच्या माध्यमातून विरोध करण्यात आला. मागण्यांचे निवेदन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तहसीलदारांमार्फत पाठविण्यात आले. आंदोलन जवळपास एक तासापर्यंत चालल्याने रस्त्याच्या दुतर्फा वाहनांची रांगच रांग लागली होती. यावेळी भूमअधिग्रहण कायदा रद्द करा अशा घोषणा देण्यात आल्या. आंदोलनात भाकपाचे जिल्हा सहसचिव संतोष दास, कार्यकारिणी सदस्य मारोती रामटेके, रमेश तावाडे, मुकेश पतरंगे, सागर भेले, सीमा पवार, डी.एच. उपासे, मनोहर ताजने, कॅप्टन अरविंदकुमार, छाया मोहीतकर, निर्मला झाडे, माला गायकवाड, लता चौधरी, सुभद्रा मेश्राम, लक्ष्मी नेवारे यांसह इतर शेतकरी, शेतमजूर मोठ्या संख्येनी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)