शहरं
Join us  
Trending Stories
1
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
2
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
3
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
4
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
5
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
6
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
7
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
8
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
9
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
10
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
11
Latest Marathi News LIVE Updates: आमच्यासाठी निवडणूक नाही तर दादांच्या स्मृतींचा यज्ञ - देवेंद्र फडणवीस
12
सामान्य फोनपेक्षा वेगळा! सॅटेलाइट फोन म्हणजे नक्की काय? भारतात बाळगल्यास होऊ शकते थेट जेल
13
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
14
IAS Kinjal Singh : संघर्षातून गाठलं यशाचं शिखर; लहानपणी वडिलांची हत्या, आईचा कॅन्सरने मृत्यू, जिद्दीने झाली IAS
15
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
16
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
17
१० हजार+ धावा, १७५ विकेट्स, पण आयपीएलमध्ये ५ वर्षे बेंचवर बसून राहिला 'हा' अष्टपैलू खेळाडू
18
Narasimha Navratri 2026: नृसिंह नवरात्र विशेष: नऊ दिवस नऊ उपासना; संकटमुक्तीसाठी करा ही विशेष साधना!
19
भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
20
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
Daily Top 2Weekly Top 5

लायड कारखान्याचे प्रदूषण थांबवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:35 IST

फोटो घुग्घुस : घुग्घुस लोक वसाहतीला लागून असलेल्या लायड मेटलच्या कारखान्यातून मागील काही दिवसांपासून प्रदूषण मोठ्या प्रमाणावर होत ...

फोटो

घुग्घुस : घुग्घुस लोक वसाहतीला लागून असलेल्या लायड मेटलच्या कारखान्यातून मागील काही दिवसांपासून प्रदूषण मोठ्या प्रमाणावर होत असल्याने नागरिकांच्या आरोग्याबरोबरच शेतीच्या पिकावर विपरीत परिणाम होत आहे. या प्रदूषणावर नियंत्रण आणावे, अशी मागणी शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख गणेश शेंडे, घुग्घुस शहरप्रमुख घोडपडे यांनी जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्याकडे निवेदनातून केली.

येथील लोक वसाहतीला लागून असलेल्या लायड मेटलचा कच्चे लोखंड बनविण्याचा कारखाना आहे. त्या कंपनीकडून मोठ्या प्रमाणावर जीवघेणे प्रदूषण होत आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर मोठा परिणाम होत आहे. हृदयविकार, दमा, चर्मरोग, अस्थमा तर बालकांना, मोठ्या माणसाला मोकळा श्वास घेणे मुश्कील झाले आहे. आपले आरोग्य चांगले व निरोगी राहावे, यासाठी लोक माॅर्निंग वॉक, सायंकाळी वाॅकिंगसाठी घराबाहेर निघतात. मात्र लायड मेटलच्या प्रदूषणामुळे श्वासाचा त्रास होऊ लागला आहे. याबरोबरच वेकोलीच्या हँडलिंग प्लांट हा गावाच्या पूर्व दिशेला तर उत्तर दिशेला रेल्वे सायडिंग आहे. या दोन्ही ठिकाणावरून कोळशाची धूळ उडत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत.

चंद्रपूर प्रदूषण नियंत्रण मंडळ यांना वारंवार निवेदन देऊन लायडचे जीवघेणे प्रदूषण थांबविण्यासाठी अनेकदा निवेदन दिले. आंदोलनेही झाली. मात्र कारखान्याचे व्यवस्थापन व प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांच्या संगनमताने हे जीवघेणे प्रदूषण सुरूच आहे. सदर प्रदूषण थांबविण्यासाठी शुक्रवारी घुग्घुसवरून वणीकडे जात असताना घुग्घुसच्या छोटेखानी कार्यक्रमात जलसंपदामंत्री जयंत पाटील यांना गणेश शेंडे, युवराज घोडपडे यांच्या नेतृत्वाखाली युवा सेना तालुकाप्रमुख हेमराज बावणे, गजानन बांदुरकर, रघुनाथ धोंगळे, प्रकाश मेहता, अजय जोगी यांनी निवेदन दिले.