दारूचा सडवा चोरला; दोन युवकांना बेदम मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:20 IST2021-06-18T04:20:20+5:302021-06-18T04:20:20+5:30

याप्रकरणी धाबा पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. ...

Stole alcohol; Two youths beaten to death | दारूचा सडवा चोरला; दोन युवकांना बेदम मारहाण

दारूचा सडवा चोरला; दोन युवकांना बेदम मारहाण

याप्रकरणी धाबा पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. गोंडपिपरी तालुक्यातील कुडे नांदगावात रवींद्र चंद्रागडे यांच्या मुलीचे बुधवारी लग्न होते. यावेळी अन्नाजी नानाजी कोडापे (२५) हा जेवण करण्यासाठी विवाह मंडपी गेला. तेव्हा भारत चंद्रागडे, प्रीतम तावाडे, प्रवीण तावाडे, केशव तावाडे, प्रेमचंद तावाडे यांनी आपला दारूचा सडवा चोरल्याचा आरोप करीत अन्नाजीला मारहाण केली. यावेळी अश्विन मोरेश्वर सोयाम हा भांडण सोडविण्यासाठी गेला असता त्यालाही मारहाण केली. दोघेही गंभीर जखमी झाले असून ग्रामीण रुग्णालय गोंडपिपरी येथे उपचार घेत आहेत. पुढील तपास ठाणेदार सुशील धोपटे करीत आहेत.

===Photopath===

170621\img-20210617-wa0018.jpg

===Caption===

बेदम मारण्यात नंतर ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत असताना

Web Title: Stole alcohol; Two youths beaten to death