शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

गंजवार्डात दुर्गंधीने नागरिक त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:29 IST

चंद्रपूर : येथील भाजी बाजार असलेल्या गंजवार्ड परिसरातील रामाळा तलावाशेजारील चौकामध्ये कचरा टाकत असल्याने रस्त्यावर दुर्गंधी पसरली आहे. या ...

चंद्रपूर : येथील भाजी बाजार असलेल्या गंजवार्ड परिसरातील रामाळा तलावाशेजारील चौकामध्ये कचरा टाकत असल्याने रस्त्यावर दुर्गंधी पसरली आहे. या रस्त्यावरून नागरिकांची ये-जा सुरू असते. मात्र, दुर्गंधीमुळे त्रास सहन करावा लागतो. महानगरपालिकेने याकडे लक्ष देऊन नियमित कचरा साफ करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

स्वयंरोजगारासाठी निधी उपलब्ध करावा

चंद्रपूर : शासनातील विविध विभागांमध्ये नोकर भरतीवर बंदी असल्याने युवक स्वयंरोजगारासाठी प्रयत्न करीत आहेत. मात्र, कर्ज मिळत नसल्याने व्यवसाय कसा उभारावा, हा प्रश्न निर्माण झाला आहे. कोरोनामुळे राज्य सरकारने निधीत मोठी कपात केली आहे. त्यामुळे बेरोजगारीत वाढ झाली आहे.

दुर्गापूर मार्गावर गतिरोधकाची मागणी

चंद्रपूर : चंद्रपूर ते दुर्गापूर मार्गावर वाहनांची मोठी वर्दळ असते. परंतु बऱ्याच ठिकाणी गतिरोधक नसल्याने अपघाताच्या घटना घडत आहेत. सकाळी व सायंकाळी या मार्गावर विद्यार्थ्यांची गर्दी असते. संभाव्य धोका टाळण्यासाठी गतिरोधक निर्माण करण्याची मागणी नागरिकांनी केली.

शहरात स्वच्छता मोहीम राबवावी

चंद्रपूर : शहरातील काही वाॅर्डामध्ये घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. अस्वच्छतेमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे. काही नागरिक रस्त्यावरच कचरा टाकतात. हा प्र्रकारही बंद करण्यासाठी मनपाने निर्देश द्यावे. या परिसरात नियमित स्वच्छता मोहीम राबविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

नि:शुल्क वाहनतळ निर्माण करावे

चंद्रपूर : विविध भागात वाहनतळ नसल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. महापालिकेने शहरात वाहनतळ निर्माण करण्याची मागणी आहे.

प्रकल्पग्रस्तांना नोकरीची प्रतीक्षा

चंद्रपूर : मागील काही दिवसांपासून प्रकल्पग्रस्तांची संख्या वाढत आहे. त्या तुलनेत त्यांना नोकरी देण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. विविध कंपन्यांनी प्रकल्पग्रस्तांना नोकरीत सामावून घ्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

अंगणवाडी केंद्रांमध्ये सुविधांचा अभाव

चंद्रपूर : ग्रामीण तसेच शहरी भागातील काही अंगणवाडी केंद्रांची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे याकडे प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे.

सिग्नल बंदमुळे अपघाताची भीती

चंद्रपूर : शहरातील मीलन, वडगाव चौकातील वाहतूक दिवे बंद असल्याने वाहतूक विस्कळीत होत आहे. याकडे वाहतूक शाखेने लक्ष देऊन सिग्नल सुरु करणे गरजेचे आहे.

ध्वनी प्रदूषणामुळे नागरिक त्रस्त

चंद्रपूर : वाहनांवर कर्णकर्कश हॉर्न लावण्यासाठी आणि भररस्त्यावर वाजविण्यासाठी बंदी आहे. मात्र, पाहिजे तशी अंमलबजावणी होत नाही. याकडे लक्ष देण्याची मागणी आहे.

नियमबाह्य वाहतूक ठरतेय धोक्याची

चंद्रपूर : नियमबाह्य व विनापरवाना अल्पवयीन वाहन चालक मोठ्या प्रमाणात वाहने चालवित आहेत. यामुळे अपघाताची शक्यता बळावली आहे. याकडे वाहतूक विभागाने लक्ष देणे गरजेचे आहे.

सराई मार्केटची स्वच्छता करावी

चंद्रपूर : शहरातील सराई मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात अस्वच्छता निर्माण झाली आहे. परिणामी, परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे.

अतिक्रमणामुळे नागरिक त्रस्त

चंद्रपूर : नागपूर - चंद्रपूर मुख्य मार्गावर असलेल्या पडोली चौकात काही नागरिकांनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे रहदारीस मोठी अडचण होत आहे. हा चौक सतत गजबजलेला असतो. त्यामुळे या चौकातील अतिक्रमण हटवावे, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

अनियंत्रित वाहनांवर कारवाई करा

चंद्रपूर : पठाणपुरा, नागपूर रोड, बल्लारपूर रोड, तुकूम, दुर्गापूर परिसरातून मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. विशेषत: नियमानुसार वाहन न चालविता वाट्टेल तसे वाहन पळविले जाते. त्यामुळे अपघाताची शक्यता आहे. एवढेच नाही तर रस्त्याच्या वळणावर वाहनाचा वेग कमी करीत नाहीत. शहरात मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. अशा वाहनांना आळा घालण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

आयुक्तालय कार्यालय निर्माण करा

चंद्रपूर : चंद्रपूर शहरात महापालिकेची निर्मिती करण्यात आली आहे. शहराची लोकसंख्या व नगर विस्तार झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे अन्य शहरांच्या धर्तीवर चंद्रपूर शहरासाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय निर्माण करावे, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. स्वतंत्र पोलीस आयुक्तालय निर्माण झाल्यास जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयावरील कामाचा ताण कमी होण्यास मदत होईल.