शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
2
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
3
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
4
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
5
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
6
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
7
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
8
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
9
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
10
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
11
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
12
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
13
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
14
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
15
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
16
इराणचा शांती प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळला! होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्याच्या बदल्यात ठेवली मोठी अट
17
'४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर...
18
LPG Price Hike: १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरपेक्षा ५ किलोचा गॅस सिलिंडर ठरतोय महागडा; कसे ते पहा, कोण वापरते? 
19
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
20
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जयप्रकाश घुमटकर यांचे निधन; ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Daily Top 2Weekly Top 5

बँक एजंटांवर उपासमारीची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2020 05:01 IST

कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी १४ एप्रिलपर्यंत संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे सर्व व्यवसाय बंद आहेत. अत्यावश्यक सेवा केवळ सुरू आहेत. यामध्ये बँका, पतसंस्था, सोसायटीचा समावेश आहे. असे असले तरी येथील बँकेच्या एजंटांना मात्र, संचारबंदीमुळे कलेक्शन करतांना अडचण निर्माण झाली आहे. मंगळवारपर्यंत संचारबंदी असून, कलेक्शनला फटका बसणार आहे.

ठळक मुद्देकोरोना इफेक्ट : महिनाभर कलेक्शनला ब्रेक मिळाल्याने अडचण

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यातील मोठ्या संख्येने पिग्मी एजंटांवर उपासमारीची वेळ आली आहे. कोरोना व्हायरसचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी संचारबंदी लागू केल्यामुळे त्यांच्या दैनंदिन कलेक्शनला ब्रेक लागला आहे. पुढील महिन्यातील पगारावर याचा परिणाम होणार असून त्यांच्यासमोर आर्थिक संकट कोसळले आहे.कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी १४ एप्रिलपर्यंत संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे सर्व व्यवसाय बंद आहेत. अत्यावश्यक सेवा केवळ सुरू आहेत. यामध्ये बँका, पतसंस्था, सोसायटीचा समावेश आहे. असे असले तरी येथील बँकेच्या एजंटांना मात्र, संचारबंदीमुळे कलेक्शन करतांना अडचण निर्माण झाली आहे. मंगळवारपर्यंत संचारबंदी असून, कलेक्शनला फटका बसणार आहे. त्यामुळे मदत करण्याची मागणी केली जात आहे.बँकांनी मदत करण्याची गरजपिग्मी एजंट हा ग्राहक आणि बँक यामधील दुवा आहे. ऊन, वारा, पावसाची तमा न बाळगता ते काम करतात. कर्ज वसुली त्यांच्यामार्फत मोठ्या प्रमाणात होते तसेच रोख रक्कम मिळवून देणारा बँकांचा महत्त्वाचा घटक आहे. कोरोना व्हायरसमुळे त्यांच्यावर आर्थिक संकट आले असून बँकांनी त्यांना अडचणीत मदत करण्याची गरज आहे.

पुढील काही महिने संकटाचेगेल्या काही महिन्यांपासून पिग्मी एजंटाचे कमिशन बँकांनी कमी केले आहे. पावसाळ्यामध्येही त्यांना फटका बसला. आता कोरोना वायरसमुळे संचारबंदीत त्यांचे काम बंद आहे. त्यांना अशा एकामागून एक संकटांना सामोरे जावे लागत आहे. १४ एप्रिलनंतरही बाजारपेठेची स्थिती लगेच सुधारेल असे चिन्ह नाही. त्यामुळे कोरोनामुळे पुढील तीन महिने तरी या एजंटावर आर्थिक संकट असणार आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या