नागपूर - वर्धा - बल्लारपूर शटल ट्रेन सुरू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 04:39 IST2020-12-14T04:39:33+5:302020-12-14T04:39:33+5:30

--- खरेदीसाठी कर्मचाऱ्यांची गर्दी चंद्रपूर : शासकीय व निमशासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी शनिवारी तसेच रविवारी फॉर्मल पोशाख खरेदीसाठी ...

Start Nagpur - Wardha - Ballarpur shuttle train | नागपूर - वर्धा - बल्लारपूर शटल ट्रेन सुरू करा

नागपूर - वर्धा - बल्लारपूर शटल ट्रेन सुरू करा

---

खरेदीसाठी कर्मचाऱ्यांची गर्दी

चंद्रपूर : शासकीय व निमशासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी शनिवारी तसेच रविवारी फॉर्मल पोशाख खरेदीसाठी बाजारात गर्दी केली आहे. त्यामुळे व्यावसायिकांचा काही प्रमाणात का होईना व्यवसाय झाला आहे.

-----

पकडिगुद्दम धरणावर पर्यटकांची गर्दी

गडचांदूर : पकडीगुडम सिंचन प्रकल्प परिसरात हिवाळ्याच्या गुलाबी थंडीत मोठी पर्यटकांची गर्दी वाढत आहे.येथील निसर्गरम्य वातावरणामुळे दूरवरून या ठिकाणी पर्यटक भेटी देत आहे. शनिवार, रविवार या दिवशी तर हा सर्व परिसर चांगलाच फुलत आहे.

शहर बस सेवा सुरू करा

चंद्रपूर : चंद्रपूर शहरात पाहिजे त्या प्रमाणात शहर बससेवेचा विस्तार झालेला नाही. त्यामुळे शहर बससेवेचे जाळे विकसित करण्यात यावे. अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. शहरातील पडोली, बंगाली कॅम्प, ऊर्जानगर, बाबुपेठ, एमआयडीसी, बिनबा गेट , मारडा, लालपेठ आदी भागात नियमित बस फेऱ्या सुरू करव्या, अशी मागणी केली जात आहे.

चंद्रपूर येथे पोलीस आयुक्तालय निर्माण करा

चंद्रपूर : शहराची लोकसंख्या व नगर विस्तार झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे अन्य शहराच्या धर्तीवर चंद्रपूर शहरासाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय निर्माण करावे, अशी मागणी नागरीकाकडून केली जात आहे.

स्वतंत्र पोलीस आयुक्तालय निर्माण झाल्यास जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाचा कामाचा ताण कमी होईल यासाठी गृह विभागाने लक्ष देण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

गडचांदूर - जिवती मार्गाचे रुंदीकरण करा

गडचांदूर : येथून नगराळा मार्गे जिवतीकडे जाणारा रस्ता अतिशय अरुंद आहे. त्यामुळे त्याचे रुंदीकरण करावे, यावे अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. या मार्गावर अनेक प्रेक्षणीय स्थळे व तेलंगणा राज्याला जोडणारा असल्याने येथून वाहतूक मोठ्या प्रमाणात आहे. मात्र डोंगर माथ्यावर हा मार्ग अतिशय अरुंद आहे. परिणामी अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे लक्ष पुरवावे अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Web Title: Start Nagpur - Wardha - Ballarpur shuttle train