केवळ हैद्राबादसाठीच एसटीचे बुकिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2020 05:00 AM2020-11-20T05:00:00+5:302020-11-20T05:00:28+5:30

चंद्रपूर आगारातुन लांब पल्ल्याच्या माेजक्या फेऱ्या आहे. यामध्ये वाशिम, गोंदिया, भंडारा, अहेरी, नागपूर, अमरावती, अकोला, हैद्राबाद, आदिलाबाद आणि गडचिरोलीला जाण्यासाठी अतिरिक्त बस सोडण्यात आल्या आहेत. लांब प्रवासासाठी काही प्रमाणात  प्रवाशी बुकींग करीत आहेत. मात्र मागील वर्षिच्या तुलनेत यावेळी  प्रवाशांचा प्रतिसाद नाही.

ST booking only for Hyderabad | केवळ हैद्राबादसाठीच एसटीचे बुकिंग

केवळ हैद्राबादसाठीच एसटीचे बुकिंग

googlenewsNext
ठळक मुद्देकोरोनाचे संकट, वैयक्तिक वाहनांनी जाणाऱ्यांची संख्या अधिक

 लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर :  दिवाळीनंतर आता गावी परतणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली असून त्यांची धावपळ सुरू झाली आहे. लांब पल्ल्याच्या बसची ऑनलाईन आरक्षण सुविधा काही प्रवासी घेत आहे. तरी मागील वर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी आरक्षण करणाऱ्यांचे प्रमाण अत्यल्प आहे. केवळ हैद्राबाद, आदिलाबाद, वाशिम, अकोला, अमरावतीसाठीच आरक्षण केले जात आहे.
दिवाळीच्या दिवसामध्ये चंद्रपूर   आगारामध्ये दररोज ८ ते १०  प्रवासी बुकिंग करीत असल्याची माहिती महामंडळाने दिली.
परिवहन महामंडळाच्या चंद्रपूर  विभागाने यावर्षी राजुरा आगाराने पुणेसाठी बस सोडली आहे. तर अन्य आगारांनी हैद्राबाद, आदिलाबाद, तसेच लांब पल्याच्या बस सोडल्या आहे. मागील काही वर्षाचा अनुभव बघता पुणेसाठी आरक्षण केले जात आहे. मात्र कोरोनाच्या संकटामुळे पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नसल्याचे महामंडळाचे म्हणणे आहे. राजुरा येथून पुणेसाठी सोबतच चंद्रपूर आगारातून वाशिम, अकोला, अमरावतीसाठी एसटी सोडण्यात येत आहेत. दरम्यान,  आर्थिक डबघाईस आलेल्या एसटीला दिवाळीमुळे प्रवाशी मिळत असून काही प्रमाणात का, होईना  आर्थिक लाभ  मि‌ळत आहे.

लांब पल्ल्याच्या फेऱ्या
चंद्रपूर आगारातुन लांब पल्ल्याच्या माेजक्या फेऱ्या आहे. यामध्ये वाशिम, गोंदिया, भंडारा, अहेरी, नागपूर, अमरावती, अकोला, हैद्राबाद, आदिलाबाद आणि गडचिरोलीला जाण्यासाठी अतिरिक्त बस सोडण्यात आल्या आहेत. लांब प्रवासासाठी काही प्रमाणात  प्रवाशी बुकींग करीत आहेत. मात्र मागील वर्षिच्या तुलनेत यावेळी  प्रवाशांचा प्रतिसाद नाही.

हैद्राबाद, अमरावतीसाठी अधिक फेऱ्या
हैद्राबाद, अमरावती, नागपूरसाठी अधिक फेऱ्या सोडल्या जात आहे. सुटीचा कालावधी आता संपण्याच्या मार्गावर असल्याने एसटीमध्ये गर्दी होऊ नये यासाठी अधिक बस सोडल्या जात आहे. यासोबतच आदिलाबाद, गडचिरोलीसाठीही बस फेऱ्या आहेत.  तर नागपूरवरून पुणेसाठी बस असल्याने नागपूरसाठी अतिरिक्त बस सोडल्या जात आहे.
परतीच्या प्रवासाची अशी आहे स्थिती
चंद्रपूर आगारातून प्रामुख्याने हैद्राबाद, आदिलाबाद, अकोला, अमरावतीसाठी बस आहे. हैद्राबाद येथून येणाऱ्या तसेच जाणाऱ्या प्रवाशांना ऑनलाईन आरक्षण बुकींग केले आहे. अनेकांनी खासगी सेवेपेक्षा एसटीच्या सेवेलाच अधिक पसंती दिली आहे.
वैयक्तिक वाहनांना अधिक पसंती
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी बहुतांश प्रवासी खासगी किंवा एसटीने प्रवास न करता वैयक्तिक वाहनांना पसंती देत आहेत. चारचाकी, दुचाकीद्वारे  प्रवास करणे सुरक्षित मानत आहे. दुचाकीवर तसेच खासगी कारने प्रवास करणाऱ्यांचा अधिक भर आहे.

Web Title: ST booking only for Hyderabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.