शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

क्रीडा संकुल की कोंडवाडा ?

By admin | Updated: May 13, 2015 00:07 IST

लाखो रुपये खर्च करून मूल येथे तालुका क्रीडा संकुलाची इमारत बांधण्यात आली.

मूल : लाखो रुपये खर्च करून मूल येथे तालुका क्रीडा संकुलाची इमारत बांधण्यात आली. तसेच परिसरातील क्रीडा संकुलात रस्ते व इतर सुविधा पुरविण्यासाठी लाखो रुपयांचे अनुदान प्राप्त झाले. मात्र अनेक सुविधांचा अभाव पदोपदी जाणवत आहे. एखाद्या समारंभासाठी क्रीडा संकुलाचा वापर केल्यानंतर तत्काळ साफ-सफाई होणे गरजेचे असते. मात्र मूल येथील क्रीडांगणावर उष्टे फेकलेले अन्न पडून राहते. त्यामुळे डुकरे, कुत्रे व जनावरांचा येथे सातत्याने धुमाकूळ सुरू असतो. येथील चित्र पाहताच क्रीडा संकूल की, कोंडवाडा असा प्रश्न उपस्थित होतो.येथे जागोजागी दारुच्या बाटल्या पडून आहेत. काही बॉटल फुटून मैदानात काचा विखरल्या आहेत. हेकाचे पडल्याने लोकांना त्रासदायक ठरत आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी नगरसेवक प्रभाकर भोयर व इतर नागरिकांनी केली आहे. जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रपूर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, तालुका क्रीडा संकुलनात लाखो रुपयांची अद्यावत साधने धुळखात पडली आहेत. ती साधने नेहमी कुलूप बंद असल्याने युवकांना त्यापासून वंचीत व्हावे लागत आहे. नव्याने रनींग ट्रॅक बनविण्यात येत आहे. मात्र बराच कालावधी लोटत असताना ते अपूर्ण अवस्थेत आहे. रेतीच्या ढिगाऱ्यामुळे लोकांना त्रास सहन करावा लागत आहे. एखाद्या समारंभासाठी क्रिडासंकुल दिल्यानंतर लागलीच स्वच्छता केली पाहिजे. मात्र स्वच्छता न केल्याने उष्ट्या अन्नावर डुकरे, कुत्रे व जनावरे तुटून पडतात. त्यामुळे क्रिडांगणावर जनावरांचा हौदोस वाढल्याचे दिसून येते. समारंभाला क्रीडा संकुलन दिल्यानंतर दारूबंदी असताना दारू पिणे व दारूच्या बाटल्या फोडने हा प्रकार अशोभणीय असून याकडे गंभीरतेने लक्ष देण्याची मागणी नगरसेवक प्रभाकर भोयर व इतर नागरिकांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)