शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीनचे उत्पादन घटले ; शेतकरी चिंतेत

By admin | Updated: November 7, 2015 00:44 IST

नगदी पीक म्हणून दिवाळीत बळीराजाच्या घरी प्रकाशाचे दिवे पेटविणारे सोयाबीन यंदा अडचणीत सापडले आहे.

प्रतिएकर दीड क्विंटलचे उत्पादन : बळीराजाची दिवाळी अंधारात जाणारगोंडपिंपरी : नगदी पीक म्हणून दिवाळीत बळीराजाच्या घरी प्रकाशाचे दिवे पेटविणारे सोयाबीन यंदा अडचणीत सापडले आहे. ऐनवेळी पावसाने दगा दिल्याने विदर्भात सोयाबीन पिकाचे उत्पादन कमालीचे घटले आहे. कधीकाळी एकरात सहा ते आठ क्विंटलचे उत्पन्न घेणाऱ्या बळीराजाच्या पदरी यावेळेस एक- दोन क्विंटल सोयाबीन हाती आले आहे. फायदा तर सोडा, उत्पादन खर्चही न निघाल्याने बळीराजापुढे मोठे संकट उभे आहे.दिवाळी साजरी करण्याच्या बळीराजाच्या स्वप्नांचा चुराडा होणार आहे. नगदी पीक म्हणून सोयाबीन पिकाकडे बघितले जाते. साधारणत: दोन महिन्यांच्या कालावधीत निघणारे सोयाबीन बळीराजाला आर्थिक स्थैर्य मिळवून देत होते. दिवाळीच्या आधी हे पीक निघत असल्याने यावर त्यांची दिवाळी अवलंबून असायची. गेल्या अनेक वर्षांपासून दुष्काळाच्या स्थितीत याच पिकाने बळीराजाला मोठा आधार दिला. एकरी सहा ते सात क्विंटल असा सोयाबीनचा सरासरी फेरा होता. काही शेतकऱ्यांनी तर एकरी नऊ क्विंटल एवढे उत्पादन घेतले आहे.यावेळी मात्र उलटेच घडले. ऐनवेळी पावसाने पाठ फिरविली. ऐन पिकाच्या भरणीच्या मोसमात पावसाने दडी मारल्याने दाण्यांची भरणी झाली नाही. शेंगा न भरल्याने सोयाबीनचा दाणा बारीक आला. ज्या शेतात एकरी सहा ते सात क्विंटल सोयाबीन व्हायचे, तिथे केवळ एक ते दोनच क्विंटल सोयाबीन हाती आले. त्यामुळे सोयाबीनसोबत असणारी बळीराजाची स्वप्नेही भंगली. विदर्भातील विशेषत: पूर्व विदर्भातील चार जिल्ह्यात सोयाबीनचे उत्पन्न मोठ्या प्रमाणावर घेण्यात येते. दोन महिन्यांत निघणाऱ्या पिकाला नगदी पीक म्हणून शेतकरीबांधव पसंतीही देतात. मात्र यावेळेस सोयाबीनचे गणितच बिघडले. सध्या सोयाबिनला बाजारात ३३०० ते ३४०० एवढा बाजारभाव आहे. एका एकरात एक सोयाबीन बॅगची पेरणी केल्यापासून तो निघेपर्यंत साधारणत: सात ते साडेसात हजार रुपये खर्च येतो. अशात एकरात एक ते दोन क्विंटल सोयाबिन निघालेल्या बळीराजाची खस्ता हालत आहे. उत्पादन खर्च निघणे कठीण झाले आहे. बाजार समित्यांतही सोयाबिनची आवक कमी झाली आहे. कृषी विभागानेही पीक कापणी निष्कर्षातून हेक्टरी चार ते पाच क्विंटल सोयाबीनचे उत्पादन निघाल्याचा शेरा दिलेला आहे. वातावरणातील असंतुलन, कमी पर्जन्यमान व कीडरोग आल्याने सोयाबीनच्या उत्पादनात यंदा कमालीची घट झाली असल्याचे विदारक चित्र आहे. (शहर प्रतिनिधी)