असंघटित कामगारांच्या प्रलंबित समस्या सोडविणार- किशोर जोरगेवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2019 06:00 IST2019-12-29T06:00:00+5:302019-12-29T06:00:26+5:30

जयंत मामीडवार, यंग चांदा ब्रिगेडच्या संयोजिका वंदना हातगावकर, अर्चना डांगरे, उषा कापसे, रेणुका फुलझेले, नंदिनी छत्रे, देवयानी डोंगरे, कोंडना मून, रतन गायकवाड, मोरेश्वर कूक्कूडकर, किशोर मत्ते, मुरलीधर पायघरे, महादेव झाडे, नंदू बोमेनवार आदींची उपस्थिती होती. आमदार जोरगेवार म्हणाले, चंद्र्रपूरात असंघटित कामगारांची संख्या अधिक आहे.

Solves pending problems of unorganized workers - | असंघटित कामगारांच्या प्रलंबित समस्या सोडविणार- किशोर जोरगेवार

असंघटित कामगारांच्या प्रलंबित समस्या सोडविणार- किशोर जोरगेवार

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : असंघटित कामगारांच्या अनेक मागण्या शासन दरबारी प्रलंबित आहेत. या मागण्याच्या पूर्ततेसाठी प्रयत्न सुरू असणार आहे. घंटागाडीवरील सफाई कामगार शहर स्वच्छ ठेवण्याचे काम करत आहे. खरे तर हे सेवेचे काम आहे. त्यामुळे कामगारांच्या मागण्यांकडे लक्ष दिले पाहिजे. किमान वेतनसाठी कामगारांचा लढा सुरू असून हा अधिकार मिळवून द्यायचा आहे, असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले. बुधवारी बाबूपेठ येथील महादेव मंदिर येथे घंटागाडी सफाई कामगार मेळाव्यात ते बोलत होते.
यावेळी जयंत मामीडवार, यंग चांदा ब्रिगेडच्या संयोजिका वंदना हातगावकर, अर्चना डांगरे, उषा कापसे, रेणुका फुलझेले, नंदिनी छत्रे, देवयानी डोंगरे, कोंडना मून, रतन गायकवाड, मोरेश्वर कूक्कूडकर, किशोर मत्ते, मुरलीधर पायघरे, महादेव झाडे, नंदू बोमेनवार आदींची उपस्थिती होती. आमदार जोरगेवार म्हणाले, चंद्र्रपूरात असंघटित कामगारांची संख्या अधिक आहे. याच कामगारांच्या भरोशावर चंद्रपूर औद्योगिक क्षेत्रात प्रगती करत आहे. पण, कामगारांच्या अनेक मागण्या प्रलंबित आहेत. चंद्र्रपूर महानगर पालिका अंतर्गत घंटागाडीवर सफाई कामगार म्हणून काम करत असलेला कामगार शहर स्वच्छ ठेवण्याचे काम करत आहे. मात्र हे करत असताना कामगांच्या मूळ समस्यांकडे नेहमीच दुर्लक्ष झाले. सुरक्षेचे कोणतेही साधन कामगारांना देण्यात आले नाही. त्यामुळे अनेकदा कचरा गोळा करताना तसेच सफाईकाम करत असताना त्यांना दुखापती झाल्या आहेत. त्यामुळे कामगांना सुरक्षेचे सर्व साधन मिळाले पाहिजे, या दिशेने राज्य शासन व मनपाकडे पाठपुरावा करत आहे. महानगर पालिकेलाही या संदर्भात सूचना करण्यात आल्या असल्याचे आमदार जोरगेवार यांनी सांगितले.
 

Web Title: Solves pending problems of unorganized workers -