जटपुरा गेट वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:34 IST2021-07-07T04:34:38+5:302021-07-07T04:34:38+5:30

चंद्रपूर : चंद्रपूर शहराला गोंड राज्यकालीन परकोटाने वेढले आहे. त्यामुळे जटपुरा गेट परिसरात वाहतूक कोंडीसह बांधकामाचा प्रश्न निर्माण ...

Solve the problem of Jatpura Gate traffic jam | जटपुरा गेट वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावा

जटपुरा गेट वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावा

चंद्रपूर : चंद्रपूर शहराला गोंड राज्यकालीन परकोटाने वेढले आहे. त्यामुळे जटपुरा गेट परिसरात वाहतूक कोंडीसह बांधकामाचा प्रश्न निर्माण होत असून प्रत्येकाला याचा त्रास होत आहे. या विषयाला घेऊन माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर यांनी केंद्रीय पर्यटन व सांस्कृतिक मंत्री प्रल्हाद पटेल यांची भेट घेत हा प्रश्न मार्गी लावण्याची विनंती करीत निवेदन दिले.

यावेळी हंसराज अहिर यांनी केंद्रीय मंत्री प्रल्हाद पटेल यांना चंद्रपूरला भेट देण्याचीही विनंती केली. गोंड राज्यकालीन काही ठळक स्थळांना भेट द्यावी व या प्रश्नांची प्रत्यक्ष पाहणी तसेच माहिती घ्यावी, अशी विनंती त्यांनी केली. मंत्री महोदयांनी चंद्रपूरला येण्याचे मान्य केले असून, ऑगस्ट महिन्याच्या शेवटी ते चंद्रपूरला येणार आहेत. तत्पूर्वी पुरातत्व विभागाचे संबंधित अधिकारी या विषयाची तपासणी करून व स्थानिक अधिकाऱ्यांशी चर्चा करून अहवाल तयार करतील, असा आदेश त्यांनी आपल्या मंत्रालयास दिला.

Web Title: Solve the problem of Jatpura Gate traffic jam