शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

‘तो’ आजही चालतो अनवानी पायाने !

By admin | Updated: May 7, 2015 01:03 IST

आजचे युग हे आधुनिक युग आहे. गावखेडे, शहरात झपाट्याने परिवर्तन होत आहे.

शरद देवाडे कान्पाआजचे युग हे आधुनिक युग आहे. गावखेडे, शहरात झपाट्याने परिवर्तन होत आहे. काळाचा ओघ पाहून मानवी आयुष्यातही बदल घडत आहे. परंतु या आधुनिक काळातही तो बदललेला नाही. येथून जवळच असलेल्या नागभीड तालुक्यातील ढोरपा येथील विश्वेश्वर लक्ष्मण विधाते (३४) हा युवक अगदी लहानपणापासून अनवानी पायानेच चालत आहे.महागडे जोडे किंवा चप्पल घालायला कधी मिळेल, या आशेत अनेकजण असतात. मात्र एम.ए. पर्यंत शिक्षण घेतलेल्या विश्वेश्वर विधाते या युवकाने प्राथमिक शिक्षणापासून तर पदव्युत्तर शिक्षणापर्यंत पायात अजूनही चप्पल व जोडे घातलेले नाही. त्याच्या या उपक्रमाने परिसरातील व गावातील लोक त्याच्याकडे कुतूहलाने पाहत असतात. कॉलेजच्या जीवनात मात्र त्याला विद्यार्थ्यांकडून होणाऱ्या थट्टेला सामोरे जावे लागले. तेवढे असूनही त्याने जगाची पर्वा न करता आपले एम.ए. पर्यंत शिक्षण ब्रह्मपुरीला पुर्ण केले. आज तो ग्रामपंचायत सदस्य आहे. मात्र अजूनही त्याने पायात साधी चप्पलही घातलेली नाही. शेतीवर अथवा कोणत्याही कामासाठी भर उन्हातही तो अनवानी पायाने रस्त्यावरुन ये- जा करीत असतो. एरव्ही लहानपणापासूनच आई- वडिलांकडे चप्पल किंवा जोडे यांचा हट्ट करणारी मुले सर्वत्र दिसून येतात. मात्र विश्वेश्वरला या पादत्राण्याचा मोह कधीच पडला नाही. त्याच्या या अनवानी चालण्यामुळे त्याला स्वत:चे लग्न जोडण्यास त्रास गेला. एकदातर जुळलेले लग्न तुटण्याच्याही मार्गावर होते. चप्पल घालत नाही. त्यामुळे तो वेडा तर नाही ना असा समज मुलीमध्ये निर्माण झाला होता. परंतु एम.ए. पर्यंत शिक्षण घेतलेला वेडा कसा असू शकतो, हे मध्यस्थीने पटवून दिल्यानंतर त्याचे अखेर लग्न जुळले. मात्र त्याने आपल्या तत्वाशी तडजोड केली नाही.चप्पल न घालता चालल्यानंतर पायाचा व डोक्याचा डायरेक्ट संपर्क येतो. त्यामुळे शरिरातील ऋण भार पायाद्वारे जमिनीत मिसळल्यामुळे त्याला अजून कोणताही आजार झाला नाही, असे त्याचे म्हणणे आहे. पायात चप्पल वा जोडे घालत नसल्याने मनाला हलकेपणा वाटतो व दैनंदिन कामात आळस येत नाही, असेही तो सांगतो. त्याला याबाबत कोणी मार्गदर्शन केले, हे सांगणे तो टाळतो. मात्र हा उपक्रम कधीही मोडीत काढत नाही.