सहा वर्षांपासून सिमेंट बंधारे अपूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2020 05:01 IST2020-02-11T05:00:00+5:302020-02-11T05:01:11+5:30

छोट्या मोठ्या नाल्यावर सिमेंट बंधारे बांधण्यास सुरुवात करण्यात आली. मात्र भडगा नाल्यावरील व चिमणघाट नाल्यावरील पूल कम बंधारे मागील सहा वर्षांपासून अपूर्ण आहेत. परिणामी शेतकरी सिंचनापासून वंचित आहेत. शासनाच्या वतीने जलयुक्त शिवार अभियानातंर्गत चिमूर तालुक्यातील मासळ क्षेत्रातील तुकूम शिवारातून वाहणाºया भडगा नाल्यावर भास्कर बोरकुटे यांच्या शेताजवळ तसेच मासळ शिवारातून वाहणाऱ्या चिमणघाट नाल्यावर राजू रामटेके यांच्या शेताजवळ बंधारा बांधण्यास सुरुवात केली.

For six years cement bonds are incomplete | सहा वर्षांपासून सिमेंट बंधारे अपूर्ण

सहा वर्षांपासून सिमेंट बंधारे अपूर्ण

ठळक मुद्देशेतकरी सिंचनापासून वंचित : बांधकाम पूर्ण करण्याची मागणी

प्रकाश पाटील ।
लोकमत न्यूज नेटवर्क
मासळ (बु) : भूजल पातळीत वाढ होऊन शेतकऱ्यांना सिंचनासाठी फायदा व्हावा, या उद्देशाने शासनाच्या वतीने छोट्या मोठ्या नाल्यावर सिमेंट बंधारे बांधण्यास सुरुवात करण्यात आली. मात्र भडगा नाल्यावरील व चिमणघाट नाल्यावरील पूल कम बंधारे मागील सहा वर्षांपासून अपूर्ण आहेत. परिणामी शेतकरी सिंचनापासून वंचित आहेत.
शासनाच्या वतीने जलयुक्त शिवार अभियानातंर्गत चिमूर तालुक्यातील मासळ क्षेत्रातील तुकूम शिवारातून वाहणाºया भडगा नाल्यावर भास्कर बोरकुटे यांच्या शेताजवळ तसेच मासळ शिवारातून वाहणाऱ्या चिमणघाट नाल्यावर राजू रामटेके यांच्या शेताजवळ बंधारा बांधण्यास सुरुवात केली. मात्र कंत्राटदाराने सदर काम सोडून पळ काढला. त्यामुळे दोन्ही बंधारे मागील सहा वर्षांपासून अपूर्ण आहेत. परिणामी नाल्याला पावसाच्या पाण्याचा संचय न होता पाणी पूर्णत: वाहून गेले. परिणामी परिसरातील विहिरींच्या पाणीपातळीत घट झाली आहे. बंधाऱ्यामुळे शेतकऱ्यांना नवसंजीवनी मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र ती अपेक्षा फोल ठरली. त्यामुळे सदर बंधारे त्वरीत पूर्ण करण्यात यावे, अशी मागणी होत आहे.

गोडबोले बंधारा क्षतिग्रस्त
मासळ गावालगत असलेला गोडबोले बंधारा क्षतिग्रस्त झाला आहे. या बंधाऱ्यावरुन अनेक शेतकरी व मजूर जाणे येणे करतात. त्यामुळे धोका संभावण्याची शक्यता आहे. त्यामुळे बंधाऱ्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.

Web Title: For six years cement bonds are incomplete