ब्रह्मपुरीत सहा लाखांचा दारुसाठा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2020 05:01 IST2020-02-11T05:00:00+5:302020-02-11T05:01:13+5:30

एका चारचाकी वाहनातून दारुची तस्करी होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारावर पोलिसांनी ब्रह्मपुरी-वडसा मार्गावरील नवगाव मक्ता परिसरात नाकाबंदी केली. यावेळी एमएच ४३ एन २८२२ क्रमांकाचे वाहन येताच वाहन थांबवून झडती घेतली. यावेळी वाहनात शंभर नग दारुचे २० बॉक्स आढळून आले. पोलिसांनी सर्व दोन लाख रुपये किंमतीची दारु व वाहन असा एकूण सहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन वाहन चालकाला अटक केली.

Six lakh ammunition seized in Brahmapur | ब्रह्मपुरीत सहा लाखांचा दारुसाठा जप्त

ब्रह्मपुरीत सहा लाखांचा दारुसाठा जप्त

ठळक मुद्देएकाला अटक : नाकाबंदी करुन केली कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क
ब्रह्मपुरी : ब्रह्मपुरी-वडसा मार्गावरील नवेगाव (मक्ता) पोलिसांनी नाकाबंदी करुन एका वाहनातून दोन लाख रुपयांची दारु व वाहन असा एकूण सहा लाखांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई रविवारी करण्यात आली. या कारवाईत एकाला अटक करण्यात आली. राहुल देवसाजन धुर्वे (२३) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
एका चारचाकी वाहनातून दारुची तस्करी होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारावर पोलिसांनी ब्रह्मपुरी-वडसा मार्गावरील नवगाव मक्ता परिसरात नाकाबंदी केली. यावेळी एमएच ४३ एन २८२२ क्रमांकाचे वाहन येताच वाहन थांबवून झडती घेतली. यावेळी वाहनात शंभर नग दारुचे २० बॉक्स आढळून आले.
पोलिसांनी सर्व दोन लाख रुपये किंमतीची दारु व वाहन असा एकूण सहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन वाहन चालकाला अटक केली. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी मिलिंद शिंदे, पोलीस निरीक्षक प्रमोद मकेश्वर यांच्या मार्गदर्शनात डीबी पथक प्रमुख उपपोलीस निरीक्षक अख्तर सैय्यद, हेडकॉन्स्टेबल क्रिष्णा रॉय, संदेश देवतळे, अमोल गिरडकर, विजय मैंद, योगेश शिवणकर, अजय कटाईत आदी उपस्थित होते.

कारवा येथून दहा लाखांची दारु जप्त
बल्लारपूर : पोलिसांनी कारवा जंगल परिसरात एका चारचाकी वाहनातून दहा लाख पाच हजार रुपये किंमतीची ६७ पेट्या देशी दारु व वाहन असा एकूण २२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. रविवारी केलेल्या या कारवाईत दोघांना अटक करण्यात आली. बालू रविंद्र बघेल व विष्णू अर्जून यादव असे अटकेतील आरोपींचे नाव आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक एस. एस. भगत यांचे मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक गोंडके, पोलीस कर्मचारी विजय मुके, नंदूरकर, प्रशांत निमगडे, पिदुरकर, राजेश मेश्राम, अनुप आष्टनकर आदींनी केली.

Web Title: Six lakh ammunition seized in Brahmapur