वैद्यनगरच्या विकासासाठी यंग चांदा ब्रिगेडचे स्वाक्षरी अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:19 IST2021-07-16T04:19:53+5:302021-07-16T04:19:53+5:30

चंद्रपूर : तुकूम येथील वैद्यनगरच्या विकासासाठी यंग चांदा ब्रिगेडचे विभाग प्रमुख आनंद सुरेशराव इंगळे यांनी पुढाकार घेत स्वाक्षरी अभियान ...

Signature campaign of Young Chanda Brigade for the development of Vaidyanagar | वैद्यनगरच्या विकासासाठी यंग चांदा ब्रिगेडचे स्वाक्षरी अभियान

वैद्यनगरच्या विकासासाठी यंग चांदा ब्रिगेडचे स्वाक्षरी अभियान

चंद्रपूर : तुकूम येथील वैद्यनगरच्या विकासासाठी यंग चांदा ब्रिगेडचे विभाग प्रमुख आनंद सुरेशराव इंगळे यांनी पुढाकार घेत स्वाक्षरी अभियान सुरू केले आहे.

या उपक्रमाला वाॅर्डातील नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान, आनंद इंगळे यांनी आमदार किशोर जाेरगेवार यांची भेट घेतली असून, याबाबत निवेदन दिले आहे. यावेळी इस्माईल चांद शेख, रामायण मिश्रा, राजेश राणे, सतीश लोहकरे, नामदेव हनुमंते, रमेश उंदीरवाडे, देवानंद किन्नाके, संतोष माकोडे, जंगलू बावणे, कैलास राऊत, अजय बावणे, रिजवान शेख, स्वानंद मेश्राम, सोनू बारसागडे, नितीन भालेराव, राम मुन्ना नाईक, दिवाकर बावणे, पराग बन्सोड, आकाश राऊत आदींची उपस्थिती होती. वैद्यनगर ही ५० वर्षांपासूनची वस्ती आहे. या वैद्यनगरचा विकास यापूर्वी कोणत्याही लोकप्रतिनिधींनी केला नाही. चंद्रपूरचे तत्कालीन जिल्हाधिकारी भोगे यांच्या काळात या नगराचा थोडाफार विकास झाला. मात्र, आता अनेक समस्या आहेत. या वस्तीतील सर्व रस्ते, नाली, विद्युतखांब व इतर अनेक विकासकामे रखडली आहेत. पावसाळ्यात येथील नागरिकांच्या घरात, दुकानात पाणी शिरते. बाजूच्या परिसरात पूर स्थिती निर्माण होते. अशा अनेक समस्या येथे भेडसावत आहे.

Web Title: Signature campaign of Young Chanda Brigade for the development of Vaidyanagar